Mumbai Local : पश्चिम रेल्वेचा प्रवास आरामदायी होणार! 15 डब्यांची लोकल येणार; कुठून कुठपर्यंत धावणार?

Last Updated:

Western Railway15Coach Local : पश्चिम रेल्वेवर विरार ते चर्चगेट 15 डब्यांच्या धीम्या लोकल सेवा हळूहळू सुरू होणार आहे.

Western Railway15Coach Local : पश्चिम रेल्वेवर विरार ते चर्चगेट 15 डब्यांच्या धीम्या लोकल सेवा हळूहळू सुरू होणार आहे.
Western Railway15Coach Local : पश्चिम रेल्वेवर विरार ते चर्चगेट 15 डब्यांच्या धीम्या लोकल सेवा हळूहळू सुरू होणार आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार असून त्यासाठी रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना कशा प्रकारे फायदा होणार आणि नवीन सेवा कधीपासून सुरु होणार याबाबतचीही सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विरार ते चर्चगेट प्रवास होणार सुलभ
विरार ते चर्चगेट मार्गावर 15 डब्यांच्या लोकलची सेवा हळूहळू सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विरार ते वांद्रेपर्यंत 15 डब्यांची लोकल धावेल आणि नंतर ही सेवा चर्चगेटपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात ही लोकल उपलब्ध असल्यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
सध्या पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते विरारदरम्यान 15 डब्यांच्या लोकल धावतात पण चर्चगेट ते अंधेरीदरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्यामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे हा विस्तार होत नाही आता या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरु केले गेले आहे.
वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या चार प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म लांबवणे, ओव्हरहेड वायर सुधारणा आणि इतर यांत्रिक सुधारणा सुरू आहेत. या कामाचे पूर्ण होण्याचे नियोजन साधारण मे-जून पर्यंत ठेवण्यात आले आहे.
advertisement
या कामांनंतर वांद्रे ते अंधेरीदरम्यान 15 डब्यांच्या लोकल्स सुरु होतील. परिणामी प्रत्येक फेरीत प्रवाशांची क्षमता सुमारे 25 टक्क्यांनी वाढेल. गर्दीच्या वेळेत ही वाढ विशेष फायदेशीर ठरणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर एकूण 211 फेऱ्या 15 डब्यांच्या लोकल आहेत त्यापैकी112 फेऱ्या धीम्या मार्गावर चालतात.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : पश्चिम रेल्वेचा प्रवास आरामदायी होणार! 15 डब्यांची लोकल येणार; कुठून कुठपर्यंत धावणार?
Next Article
advertisement
Raj Thackeray: मतदानाच्या काही तास आधीच राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप, ''सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाकडून...''
मतदानाच्या काही तास आधीच राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप, ''सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक आ
  • महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी काही तासांचा अवधी राहिला

  • प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मतदारांशी संपर्क साधण्याची मुभा दिली आहे

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

View All
advertisement