Accident News : पनवेलमध्ये भीषण अपघात; भरधाव दुचाकीनं दोघांना उडवलं, एक ठार, एक जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पनवेलमधून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वारानं दोघांना उडवलं, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.
पनवेल, 5 डिसेंबर, प्रमोद पाटील : पनवेलमधून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वारानं दोघांना उडवलं या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे, तर पुरुष गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात संबंधित दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन भिंगारकर असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. हे दोघेही आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असताना त्यांना भरधाव दुचाकीनं धडक दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रस्ता ओलांडून बस स्टॉपवर जात असताना एका महिलेला आणि पुरुषाला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. हा अपघात कोप्रोली चिपळेमध्ये घडला आहे. या अपघातामध्ये 84 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. गोदावरीबाई दुबे असं या मृत महिलेचं नाव आहे. तर सतीश दुबे हे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.
advertisement
गुन्हा दाखल
गोदावरीबाई दुबे आणि सतीश दुबे हे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान हा अपघात घडला आहे. त्यांना भरधाव वेगानं येणाऱ्या दुचाकीची धडक बसली, या अपघातात गोदावरीबाई दुबे यांचा मृत्यू झाला तर सतीश दुबे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणात दुचाकीचालक चेतन भिंगारकर याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यत आली.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
December 05, 2023 8:16 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Accident News : पनवेलमध्ये भीषण अपघात; भरधाव दुचाकीनं दोघांना उडवलं, एक ठार, एक जखमी