माटुंग्यात याठिकाणी मिळतं अगदी घरासारखं जेवण, दर अगदीच कमी, चवही भारी, विद्यार्थ्यांची होते चांगलीच गर्दी!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
स्वामी समर्थ लंच होममध्ये रोज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतील. यांची व्हेज थाळी फक्त 80 रुपयांना मिळते. यामध्ये तुम्हाला भात, दोन चपात्या, गरमागरम डाळ, दोन भाज्या, पापड किंवा तोंडी लावण्यासाठी कुरकुरे मिळतात. जेवणानंतर इथे स्वीटसुद्धा उपलब्ध असते.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसारख्या शहरात गावखेड्यातून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी, वेगवेगळे कोर्सेस करण्यासाठी येतात. हे विद्यार्थी एकतर हॉस्टेलमध्ये किंवा पीजीमध्ये राहत असल्यामुळे त्यांना व्यवस्थित घरचे अन्न मिळत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना चांगले घरगुती जेवण मिळावे, या उद्देशाने एका तरुणाने पुढाकार घेतला. विशाल सोनावणे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने माटुंगा स्टेशन पासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या रुईया कॉलेज समोरच त्याच्या काही मित्रांसोबत मिळून 'श्री स्वामी समर्थ लंच होम'ला सुरुवात केली.
advertisement
विद्यार्थी खूप आशेने त्यांच्याकडे येतात. त्यामुळे त्यांना आवडेल आणि त्यांचे जेवून पोट आणि मन दोन्ही भरेल असेच अन्न विशाल आणि त्याची टीम मुलांना देतात. माटुंग्यात अनेक कॉलेजेस असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ त्यामुळे साधारण 400 ते 500 मुलं रोज इथे जेवायला येतात.
स्वामी समर्थ लंच होममध्ये रोज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतील. यांची व्हेज थाळी फक्त 80 रुपयांना मिळते. यामध्ये तुम्हाला भात, दोन चपात्या, गरमागरम डाळ, दोन भाज्या, पापड किंवा तोंडी लावण्यासाठी कुरकुरे मिळतात. जेवणानंतर इथे स्वीटसुद्धा उपलब्ध असते.
advertisement
श्रावणात करा महादेवाचं कौटुंबिक दर्शन, मुंबईतील ही 5 मंदिरे आहेत प्रसिद्ध, photos
विशाल सोनवणे यांनी 4 वर्षांपूर्वी या स्टॉलची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसाय फारसा चालत नव्हता. मात्र, ज्या वेळेस विद्यार्थ्यांना ही चव आवडायला लागली, तेव्हा पोट भरून जेवण कुठे करायचे तर स्वामी समर्थ लंच होम याठिकाणी, असे समीकरण झाले. व्हेज सोबतच इथे नॉनव्हेज थाळीसुद्धा मिळते. त्यासोबत बिर्याणीसुद्धा इथे उपलब्ध आहे. यांच्या बिर्याणीची चव खूप चविष्ट असते. सध्या श्रावण महिना असल्यामुळे इथल्या डाळ भाताची चव सुद्धा विद्यार्थ्यांना आवडायला लागली आहे.
advertisement
'आमच्या इकडे जेवण बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते. स्वच्छतेमुळे विद्यार्थी आपोआपच आमच्याकडे, आमच्या जेवणाकडे आकर्षित होतात. 4 वर्षांपूर्वी हा स्टॉल सुरू करताना इतका विद्यार्थ्यांचा प्रतिसाद येईल, अशी किंचितही आशा नव्हती. मात्र, आता विश्वास वाढला आहे,' असे मत विशाल सोनवणे यांनी व्यक्त केले.
advertisement
दरम्यान, याठिकाणी फक्त विद्यार्थीच नाहीत तर कामाला जाणारे सुद्धा अनेक लोक येऊन पोटभर जेवण करतात. माटुंग्यातील श्री स्वामी समर्थ लंच होम हे उत्तम घरगुती आणि चविष्ट जेवणासाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्हालाही जर या घरगुती जेवणाची चव चाखायची असेल तर तुम्हीही या श्री स्वामी समर्थ लंच होमला भेट देऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2024 2:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
माटुंग्यात याठिकाणी मिळतं अगदी घरासारखं जेवण, दर अगदीच कमी, चवही भारी, विद्यार्थ्यांची होते चांगलीच गर्दी!