Spy सारखा बुरखा घालून 'तो' मिशनवर निघाला अन् लोकांनी धरून चोपला, कारण निघालं भलतंच, VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात दुपारच्या सुमारात एक व्यक्ती बुरखा घालून फिरत होता. लोकांच्या बुरखा घालून फिरणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या
राजेश शिंदे, प्रतिनिधी
मुंबई : सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अशातच मागील काही दिवसांपासून 'मुलं चोरणारी टोळीचे' मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. पालक आपल्या लेकरांबद्दल चांगलेच सतर्क झाले आहे. मुंबई आणि उपनगरासह ठाण्यात हा अफवांना पेव फुटला आहे. अशातच विक्रोळी परिसरात बुरखा घालून फिरणाऱ्या एक संशयित तरुणामुळे गोंधळ उडाला होता. अखेरीस स्थानिक लोकांनी मुलं चोरण्याच्या संशयावरून या तरुणाचा बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पण, या तरुणाचं सत्य समोर आल्यावर, पोलिसांनी डोक्याला हात लावला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विक्रोळी परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात दुपारच्या सुमारात एक व्यक्ती बुरखा घालून फिरत होता. लोकांच्या बुरखा घालून फिरणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे स्थानिक लोकांनी त्याला पकडून चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. बुरखाधारी व्यक्ती मुलं पळवण्यास आला होता, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं हा प्रकार घडला, असं पोलिसांनी सांगितलं. पण, बुरखाधारी तरुणाचं सत्य वेगळंच होतं.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याचं नाव तौसीफ मोहमदिन शेख (वय 33 वर्ष धंदा रिक्षा चालक, राहणार, चंद्रभागा सोसायटी, पार्कसाईट) असून तो त्याच हद्दीत रिक्षा चालवतो. दोन दिवसांपूर्वी त्याने त्यांच्या रिक्षात काही लोकांना बसून आणून आनंद गड नाका इथं सोडलं होतं. तिथे त्यांच्याशी वाद झाला होता. त्यामुळे प्रवाशांनी मोहमदिन शेखला त्याच्या भाड्याचे पैसे दिले नव्हते. त्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तो बुरखा घालून फिरत होता. पण, बुरखा घालून फिरणाऱ्या तौसीफवर लोकांना संशय आला. त्यामुळे हा मुलं चोरायला आला असं समजून त्याला चांगलाच चोप दिला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाच्या ताब्यातून तौफीकची पोलिसांनी सुटका केली. त्याची चौकशी केली असता तो रिक्षाचालक निघाला. पण, तौफीकने सगळी हकीकत सांगितलं. पोलिसांनी हा सगळा प्रकार मुलं पळवून नेणाऱ्या टोळीच्या व्हायरल मेसेजमुळे हा प्रकार घडला, असं सांगितलं आहे. ठाण्यात कुठेही असे प्रकार घडले नाही, त्यामुळे सोशल मीडियाच्या मेसेज आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 6:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Spy सारखा बुरखा घालून 'तो' मिशनवर निघाला अन् लोकांनी धरून चोपला, कारण निघालं भलतंच, VIDEO









