मांडी-कमरेत सोनं लपवलं; गोल्ड स्मगलिंगमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, 102 कोटींचा दंड
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
गोल्ड स्मगलिंग केसमध्ये डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटलिजन्स (DRI) ने प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीला 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई : गोल्ड स्मगलिंग केसमध्ये डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटलिजन्स (DRI) ने प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी रान्या रावशिवाय हॉटेल व्यावसायिक तरुण कोंडाराजू आणि ज्वेलरी व्यापारी साहिल सकारिया जैन आणि भरत कुमार जैन यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. डीआरआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सह आरोपी तरुण कोंडाराजूवर 63 कोटी रुपये आणि साहिल सकारिया जैन तसंच भरत कुमार जैन यांच्यावर प्रत्येकी 56-56 कोटी रुपये दंड लावण्यात आला आहे.
सर्व आरोपी जेलमध्ये
डीआरआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दंडाची नोटीस या चारही आरोपींना बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आली आहे. हे चारही आरोपी सध्या जेलमध्येच आहेत. प्रत्येक आरोपीला 250 पानांची नोटीस पाठवण्यात आली आहे, ज्यात पुरावे आणि कागदपत्र आहेत.
गोल्ड स्मगलिंग करताना सापडली रान्या
हे प्रकरण मार्च महिन्यातील आहे, 3 मार्चली रान्या राव दुबईमधून बंगळुरूला आली होती, तेव्हा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला 14.8 किलोच्या सोन्यासह पकडण्यात आलं होतं, ज्याची किंमत 12.56 कोटी रुपये आहे. रान्या राव दुबईमधून परत येत होती, तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिच्या सामनाची तपासणी केली, ज्यात त्यांना स्मगल केलेलं सोनं सापडलं. रान्या रावने तिच्या मांड्या आणि कंबरेमध्ये हे सोनं लपवलेलं होतं.
advertisement
52 वेळा दुबईची यात्रा
तपासामध्ये रान्या रावने अनेकवेळा दुबईची यात्रा केल्याचंही समोर आलं. 2023 ते 2025 या काळात रान्या राव तब्बल 52 वेळा दुबईमध्ये गेली. रान्या रावच्या घरातून तपास अधिकाऱ्यांनी 2 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली.
रान्या राव ही वरिष्ठ पोलीस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर के. रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं, पण काही दिवसानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. गोल्ड स्मगलिंग प्रकरणी जुलै महिन्यात रान्या रावला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली, यानंतर हे प्रकरण आता कर्नाटक हायकोर्टामध्ये पोहोचलं आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 11 सप्टेंबरला ठेवली आहे.
view commentsLocation :
Bangalore,Karnataka
First Published :
September 03, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/देश/
मांडी-कमरेत सोनं लपवलं; गोल्ड स्मगलिंगमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, 102 कोटींचा दंड


