Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कधी खरेदी करावं सोनं, वाचा शुभ मुहूर्त
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेली पूजा आणि दान अक्षय्य फळ देतं. माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने धनाची प्राप्ती होते. यावेळी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राहू कालही आहे.
मुंबई : अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या निमित्ताने सोनं, चांदी खरेदी केली आहे. आजचा दिवस शुभं असल्याने लोक घर, गाडी किंवा कुठेतरी चांगली गुंतवणूक करत असतात. या मुहूर्तावर केलेल्या खरेदीमुळे घरात कायम समृद्धी राहाते असं म्हणतात. त्यामुळे दीर्घकाळासाठी त्याचा फायदा होतो.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेली पूजा आणि दान अक्षय्य फळ देतं. माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने धनाची प्राप्ती होते. यावेळी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राहू कालही आहे. अनेक शुभ योगही तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेला नवीन वस्तू किंवा सोनं खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त असतो. त्या कालावधीत जर ते खरेदी केलं तर त्याला लाभ अधिक चांगला मिळू शकतो.
advertisement
ज्योतिषानं दिलेल्या माहितीनुसार दागिन्यांचं प्रतिनिधीत्व करतो तो गुरू आणि शुक्र ग्रह. तर गुरू ग्रह सोन्याचं प्रतिनिधीत्व करतो. या वर्षी गुरू आणि शुक्र दोन्ही ग्रहांवर सूर्याचा परिणाम होणार आहे. जेव्हा कोणताही ग्रह सूर्याजवळ येतो तेव्हा तो त्याचं वैशिष्ट्य किंवा त्याची शक्ती गमावतो. सूर्य हा ग्रहांचा राजा आणि त्याच्याजवळ जे काही येतं, त्या प्रत्येकावर त्याची आग आणि तेजाचा परिणाम होतो. आज अक्षय्य तृतीयेला गुरू आणि शुक्र सूर्याच्या जवळ आहेत, त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करू नका.
advertisement
तरीही तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हा या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला नुकसान होणार नाही. अक्षय्य तृतीयेला खरेदीसाठी चार शुभ मुहूर्त आहेत. या शुभ काळात खरेदी केल्यास खूप शुभ परिणाम मिळतील.
अक्षय्य तृतीयेला खरेदीसाठी पहिली शुभ वेळ - सकाळी 5.33 ते 10.37
दुसरा मुहूर्त - दुपारी 12.18 ते 1.59 पर्यंत
advertisement
तिसरा मुहूर्त - संध्याकाळी 5.21 ते 7.02 पर्यंत
चौथा मुहूर्त - रात्री 9.40 ते 10.59 पर्यंत असेल.
अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते, परंतु प्रत्येकजण सोने-चांदीच्या वस्तू खरेदी करू शकत नाही. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मातीचा घागर, पिवळ्या कवड्या, गोवऱ्या, बार्ली, पिवळी मोहरी, दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र किंवा धणेही खरेदी करू शकतात. या वस्तू खरेदी केल्याने भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2024 8:12 AM IST