Thama Trailer : हसवणार की घाबरवणार? हॉरर युनिव्हर्समध्ये आयुष्मान-रश्मिकाची धमाकेदार एन्ट्री! 'थामा'चा भयानक ट्रेलर रिलीज
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Thama Movie Trailer : आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यावेळी पहिल्यांदाच आयुष्मान आणि रश्मिका मंदाना एकत्र दिसणार आहेत.
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये हॉरर-कॉमेडी चित्रपटांची लाट आली आहे, आणि त्यात आणखी एका धमाकेदार चित्रपटाची भर पडली आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘थामा’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘स्त्री’ आणि ‘भेडीया’ च्या दुनियेतील ही नवी गोष्ट प्रेक्षकांना वेड लावणारी आहे.
‘थामा’च्या ट्रेलरची सुरुवात होते ती बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या दमदार डायलॉगने. त्यानंतर होते आयुष्मान खुरानाची धमाकेदार एन्ट्री. ट्रेलरमध्ये दिसतं की, आयुष्मान रश्मिकाच्या प्रेमात पडतो आणि तिथून त्याच्या आयुष्यात एक मोठा आणि भयानक ट्विस्ट येतो.
advertisement
सर्वात मोठा खुलासा म्हणजे, या दोघांनाही ‘व्हॅम्पायर’च्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे, ज्यामुळे हॉरर आणि कॉमेडीचा तडका जबरदस्त जमून आला आहे. तसेच, कॉमेडीचे किंग परेश रावल आयुष्मानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलर लाँच एका मोठ्या कार्यक्रमात करण्यात आला, जिथे आयुष्मानसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही लाल साडीत हजेरी लावली होती, जी खूपच सुंदर दिसत होती.
advertisement
कधी रिलीज होणार फिल्म?
‘थामा’ हा चित्रपट याच वर्षी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्यांदाच आयुष्मान आणि रश्मिकाची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. याआधी रश्मिका ‘छावा’ या हिंदी चित्रपटात विकी कौशलसोबत दिसली होती.
advertisement
‘स्त्री’ आणि ‘मुंज्या’ सारखे हिट चित्रपट देणाऱ्या मॅडॉक फिल्म्सकडून हा नवा प्रयोग प्रेक्षकांना किती आवडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 9:50 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Thama Trailer : हसवणार की घाबरवणार? हॉरर युनिव्हर्समध्ये आयुष्मान-रश्मिकाची धमाकेदार एन्ट्री! 'थामा'चा भयानक ट्रेलर रिलीज