Ind vs Pak: देशभक्तीच्या बाता करणाऱ्यांनो 'चुल्लू-भर पानी में डूब मरो', भारत पाकिस्तान सामन्यावर ओवैसींचा संताप
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Asaduddin Owaisi on India vs Pakistan: एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळणाच्या निर्णयावर केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत.
नवी दिल्ली : आशिया कप करंडक स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात रविवारी लढत होत आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंकर भारताने पाकिस्तान विरोधात राबविलले ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदात उभय संघांमध्ये क्रिकेटचा सामना होत असल्याने त्याची जोरदार चर्चा आहे. ज्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या त्या देशाच्या संघाबरोबर भारताने खेळू नये, अशी भूमिका अनेक जण मांडत आहे. एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळणाच्या निर्णयावर केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत.
देशातील मुस्लिमांना धडा शिकविण्याची भाषा इथले राजकारणी वारंवार बोलून दाखवतात. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे द्वेषपूर्ण भाषा वापरतात. मला त्यांना विचारायचंय, नेहमी देशभक्तीच्या बाता मारता, मग आता आपला शत्रू पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना होत असताना तुमची देशभक्ती कुठे जाते? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
advertisement
'चुल्लू-भर पानी में डूब मरो'
ज्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून भारताच्या २६ नागरिकांना मारले. तुमच्यात एवढीही ताकद नाहीये की तुम्ही क्रिकेट सामना खेळायला नकार देऊ शकता. बहादुरी दाखवायचीच आहे तर आपल्या देशातील मुस्लिम नागरिकांविरोधात न दाखवतात पाकिस्तानला दाखवा ना... तुम्ही कुणाच्या डोळ्यात डोळे घालून बघता. प्रत्येक गोष्टीचा त्याग करायला आम्ही तयार आहोत, मात्र तुमच्यासमोरच कधीही झुकणार नाही. आम्ही इज्जतीचा व्यापार कधी करणार नाही. तुमच्या पोरी जर पहलगाम हल्ल्यात मारल्या असत्या तर तुम्ही पाकिस्तानविरोधात खेळला असता का? असे बोचरे सवाल करीत देशभक्तीच्या बाता करणाऱ्यांनो'चुल्लू-भर पानी में डूब मरो' असा संताप ओवैसी यांनी व्यक्त केला.
advertisement
ज्या मुलीच्या हातावरची मेहंदी उतरली नाही तिच्या नवऱ्याला मारले जाते, असे असतानाही...
ज्या मुलीच्या हातावरची मेहंदी उतरली नाही तिच्या नवऱ्याला मारले जाते. असे असतानाही तुम्ही पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळण्याचा निर्णय कसा घेऊ शकता? सामना खेळून किती पैसे येतील सहाशे सातशे कोटी? खून और पाणी एकसाथ बह नहीं सकता असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मग आता त्याच देशाबरोबर क्रिकेट सामना कसा खेळू शकता? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, असे आव्हान ओवैसी यांनी दिले.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
September 14, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/देश/
Ind vs Pak: देशभक्तीच्या बाता करणाऱ्यांनो 'चुल्लू-भर पानी में डूब मरो', भारत पाकिस्तान सामन्यावर ओवैसींचा संताप