Delhi CM Attacked : दिल्लीच्या CM वर झालेल्या हल्ल्याचं गुजरात कनेक्शन! आरोपीचा पहिला फोटो समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Attack on Delhi CM Rekha Gupta : आरोपीने त्याचं नाव राजेश खिमजी असं सांगितलं आहे आणि तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचं सांगितलं आहे.
Delhi CM Attacked Gujarat connection : देशाच्या राजकारणाता हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सीएम हाऊसमध्ये हल्ला झाला आहे. रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्याचं गुजरात कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर आता आरोपी पोपटासारखा बोलला अन् त्याने हल्ल्याची माहिती दिली आहे.
आरोपी गुजरातचा
आरोपीने त्याचं नाव राजेश खिमजी असं सांगितलं आहे आणि तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. त्याचं नाव आणि पत्ता पडताळला जात आहे. त्याची कागदपत्रे देखील तपासली जात आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
नेमकं काय झालं?
जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिलेली माहिती दिली. जनसुनावणी सुरू असतानाच एका व्यक्तीने मुख्यमंत्री यांना काही कागदपत्रे दिली आणि नंतर अचानक त्यांचा हात पकडून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. या धक्काबुक्कीदरम्यान लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. या घटनेमागचे कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
Image of individual who attacked Delhi CM Rekha Gupta. Picture has been verified by official sources https://t.co/oQsI7oYXwE pic.twitter.com/jIYvacsIn4
— ANI (@ANI) August 20, 2025
मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर
वीरेंद्र सचदेवा यांनी पुढं सांगितलं की, मुख्यमंत्री यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. त्या एक खंबीर महिला आहेत, मात्र त्यांच्या डोक्याला थोडी दुखापत झाली आहे. राजकारणात अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
advertisement
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
दरम्यान, मी उत्तम नगरहून गटाराच्या तक्रारीसह आलो होतो. जेव्हा मी गेटवर पोहोचलो तेव्हा मुख्यमंत्र्यांना थप्पड मारल्यामुळे गोंधळ उडाला, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. झालेला प्रकार चुकीचा आहे, असंही त्याने यावेळी सांगितलं.
Location :
Delhi
First Published :
August 20, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi CM Attacked : दिल्लीच्या CM वर झालेल्या हल्ल्याचं गुजरात कनेक्शन! आरोपीचा पहिला फोटो समोर