advertisement

मायावतींच्या राजकारणाचं नवं पर्व, ब्राह्मणांचा अपमान म्हणत शड्डू ठोकला, 'घुसखोर पंडित'च्या विरोधात एल्गार

Last Updated:

Ghooskhor Pandit Controversy: 'घुसखोर पंडित' या चित्रपटाने ब्राह्मण समाजाच्या भावना दुखविल्याचे मायावती म्हणाल्या.

मायावती
मायावती
मुंबई : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी ब्राह्मण समुदायाच्या अपमानाबद्दल चिंता व्यक्त करत 'घुसखोर पंडित' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाने ब्राह्मण समाजाच्या भावना दुखविल्याचे मायावती म्हणाल्या.
दलित की बेटी असे अभिमानाने सांगणाऱ्या मायावतींनी तथाकथित उच्चवर्णीयांना देखील आपल्या बहुजन समाज पक्षाकडे खेचण्यात यश मिळवले. सध्या डळमळीत झालेल्या बसपाला उभारी देण्यासाठी त्यांनी पुन्हा ब्राह्मण समुदायाला कुरवाळल्याचे दिसून येत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

घुसखोर पंडित चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला

ही दुःखाची आणि चिंतेची बाब आहे की गेल्या काही काळापासून, केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर आता चित्रपटांमध्येही, देशभरात 'पंडितांना घुसखोर म्हणून घोषित करून त्यांचा अपमान आणि अपमान केला जात आहे. यामुळे संपूर्ण ब्राह्मण समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. बसपा याचा तीव्र निषेध करते. केंद्र सरकारने अशा जातीवादी चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, अशी मायावती यांनी मागणी केली.
advertisement

दिग्दर्शकावर गुन्हा दाखल

घुसखोर पंडित चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि त्यांच्या टीमविरुद्ध हजरतगंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जातीय भावना दुखावल्याबद्दल आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दिग्दर्शकाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखनऊ पोलिस आयुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजातील सलोखा बिघडवणाऱ्या आणि धार्मिक आणि जातीय भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. चित्रपटाचे शीर्षक एका विशिष्ट जातीला (ब्राह्मण) लक्ष्य करून त्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने निवडण्यात आले आहे, ज्यामुळे समाजात प्रचंड संताप आणि संताप आहे. दिग्दर्शक आणि त्यांच्या टीमने समाजात द्वेष पसरवण्याच्या, शांतता आणि सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने हा सिनेमा केलाय की काय अशी शंका येते. कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
advertisement

'बहुजन हिताय' बरोबरच उच्चवर्णीयांनाही जवळ करण्याचे चातुर्य, मायावती यांच्या राजकारणाची शैली

दलित आणि वंचितांच्या नावाने चालणाऱ्या पक्षाला उच्चवर्णीयांची साथ मिळाली की सत्तेची चव आपण चाखू शकतो, हे मायावतींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोशल इंजिनिअरिंग राबवले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मायावतींचे स्वीय सचिव, सल्लागार राहिलेले सतीश चंद्र मिश्र... बसपाचे निवडणूक चिन्ह हे हत्ती परंतु हाथी नहीं गणेश है-ब्रह्मा विष्णू महेश हैं... अशी घोषणा देऊन कोट्यवधी तथाकथइत उच्चवर्णियांना त्यांनी बसपाच्या बाजूने वळवले. एकंदर 'बहुजन हिताय' बरोबरच उच्चवर्णीयांनाही जवळ करण्याचे चातुर्य मायावती यांनी दाखवले.
view comments
मराठी बातम्या/देश/
मायावतींच्या राजकारणाचं नवं पर्व, ब्राह्मणांचा अपमान म्हणत शड्डू ठोकला, 'घुसखोर पंडित'च्या विरोधात एल्गार
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement