CBSEचा क्रांतिकारी निर्णय, नववीत ‘ओपन-बुक’ परीक्षा; पाठांतर नको नोट्स, पुस्तकं घेऊन बसणार विद्यार्थी

Last Updated:

Open-Book Assessments: CBSE ने 2026-27 पासून नववीच्या वर्गात ओपन-बुक असेसमेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीत विद्यार्थी परीक्षेदरम्यान पाठ्यपुस्तके व नोट्स वापरू शकतील. ज्यामुळे पाठांतराऐवजी वैचारिक समज आणि क्रिटिकल थिंकिंगला चालना मिळेल.

News18
News18
नवी दिल्ली: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून नववीच्या वर्गात ओपन-बुक असेसमेंट (Open-book assessment) सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या संदर्भात केलेल्या पायलट स्टडीमध्ये शिक्षकांनी अशा प्रकारच्या मूल्यमापनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जूनमध्ये झालेल्या बैठकीत CBSE च्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या गव्हर्निंग बॉडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
ओपन-बुक असेसमेंट म्हणजे काय?
या प्रस्तावानुसार नववीच्या वर्गात प्रत्येक सत्रातील तीन पेन-पेपर असेसमेंटपैकी एक ओपन-बुक असेसमेंट असेल. यात भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यांसारख्या मुख्य विषयांचा समावेश असेल. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन (NCFSE) २०२३ नुसार, ओपन-बुक असेसमेंट हे मूल्यमापनाचे एक संभाव्य स्वरूप आहे.
एनसीएफएसईनुसार ओपन-बुक टेस्ट म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तर देताना पाठ्यपुस्तके, नोट्स किंवा इतर संदर्भ साहित्याचा वापर करण्याची परवानगी असते. अशा चाचण्या विद्यार्थ्यांची माहिती वापरण्याची आणि ती विविध संदर्भांमध्ये लागू करण्याची क्षमता तपासतात त्यामुळे या चाचण्यांचा भर पाठांतर करण्याऐवजी उपयोजन आणि संश्लेषणावर (application and synthesis) असतो.
advertisement
पायलट स्टडीची निरीक्षणे
डिसेंबर 2023 मध्ये बोर्डाने 9 वी ते 12 वीच्या वर्गांसाठी ओपन-बुक असेसमेंटचा पायलट स्टडी करण्यास मंजुरी दिली होती. या अभ्यासात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. ज्यात त्यांचे गुण 12% ते 47% च्या दरम्यान होते. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्याचा प्रभावीपणे वापर करण्यात आणि आंतरविद्याशाखीय संकल्पना समजून घेण्यात काही अडचणी येत असल्याचे दिसून आले.
advertisement
या आव्हानानंतरही शिक्षकांनी या पद्धतीबद्दल सकारात्मकता व्यक्त केली. शिक्षकांच्या मते यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गंभीर विचार करण्याची (critical thinking) क्षमता विकसित होऊ शकते.
भविष्यातील योजना
CBSE आता प्रश्नांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि गंभीर विचारसरणीला चालना देण्यासाठी प्रमाणित नमुना प्रश्नपत्रिका तयार करणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करणे, ज्ञानाचा वास्तविक जीवनात वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि पाठांतराऐवजी वैचारिक समजावर (conceptual understanding) लक्ष केंद्रित करणे आहे.
advertisement
2014 मध्येही CBSE ने अशीच ओपन टेक्स्ट-बेस्ड असेसमेंट (OTBA) सुरू केली होती. पण 2017-18 मध्ये ती बंद करण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वपूर्ण क्षमता विकसित करण्यात ती प्रभावी ठरली नाही, असे बोर्डाने म्हटले होते.
view comments
मराठी बातम्या/देश/
CBSEचा क्रांतिकारी निर्णय, नववीत ‘ओपन-बुक’ परीक्षा; पाठांतर नको नोट्स, पुस्तकं घेऊन बसणार विद्यार्थी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement