Youtube पाहून फटाके बनवण्याचा केला प्रयत्न, 5 मुलांसोबत घडली धक्कादायक घटना
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
यूट्यूबवर व्हिडिओ पाहून पाच मुले फटाके कसे तयार करतात, हे शिकत होते. मात्र, फटाका फुटल्याने पाच मुले गंभीररित्या भाजली गेली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
ऋतू राज, प्रतिनिधी
मुजफ्फरपुर : सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यात यूट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. अनेक लोकं या सर्व गोष्टी फॉलोही करतात. पण अनेकदा या सर्व गोष्टी घातक ठरतात. अशीच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
यूट्यूबवर व्हिडिओ पाहून पाच मुले फटाके कसे तयार करतात, हे शिकत होते. मात्र, फटाका फुटल्याने पाच मुले गंभीररित्या भाजली गेली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं -
मुजफ्फरपुरच्या गायघाटमध्या मुनी कल्याणा गावात ही धक्कादायक घटना घडली. येथे स्फोटक साहित्याचा स्फोट झाला. यानंतर मुलांना उपचारासाठी गयाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. गावातील दोन मुलांनी इतर मुलांना बोलावून घेऊन गेले होते, अशी माहिती पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी दिली.
Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..
याबाबत मुजफ्फरपुरचे एसएसपी राकेश कुमार माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुनी कल्याणा गावातील 5 मुले यूट्यूब पाहून फटाके कसे तयार करतात, हे शिकत होते. ते सर्वजण बारूद आणि माचिसच्या काड्या ठेवून नवीन फटाके बनवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याच क्षणी त्याचा स्फोट झाला आणि सर्व मुले भाजली गेली. सध्या त्यांच्यावर गायघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेने मोठा खळबळ उडाली आहे.
advertisement
बाहेर हिंसा, विद्यार्थिनींना आतमध्ये कोंडले; नेटवर्कही होते बंद, बांग्लादेशमधून आलेल्या MBBS च्या विद्यार्थिनीचा भयानक अनुभव
आजकाल यूट्यूबवर व्हिडिओ पाहून काहीही बनवता येते. खाण्यापासून ते बारूद बनवण्यापर्यंत सर्वच व्हिडिओ येथे उपलब्ध असतात. अनेक जण हे व्हिडिओ फॉलो करतात. नवनवीन गोष्टी शिकतात. मात्र, कधी कधी हे जीवघेणे ठरू शकते. यूट्यूब पाहिल्यानंतर तुम्हीही असा प्रयोग करण्याचा विचार करत असाल तर सावधान व्हायला हवे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
Aug 08, 2024 1:09 PM IST









