Delhi Elections : एकजूट दूर राहिली, आता थेट लढाई, दिल्लीत केजरीवालांविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार

Last Updated:

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे बिगुल अद्याप वाजले नसले तरी राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे.

एकजूट दूर राहिली, आता थेट लढाई, दिल्लीत केजरीवालांविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार
एकजूट दूर राहिली, आता थेट लढाई, दिल्लीत केजरीवालांविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे बिगुल अद्याप वाजले नसले तरी राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. यासोबतच उमेदवारांच्या नावांची घोषणाही सुरू झाली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षानंतर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीत 21 उमेदवारांची नावे समाविष्ट केली आहेत.
काँग्रेसने संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात 'आप'चे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने केजरीवालांविरोधात संदीप दीक्षित यांना तिकीट दिले आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवतात, त्यामुळे यावेळी निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे. भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहे, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारीही सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/देश/
Delhi Elections : एकजूट दूर राहिली, आता थेट लढाई, दिल्लीत केजरीवालांविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement