40 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, विद्यार्थ्यांसह पालकांचे टेन्शन वाढले; पोलिसांनी दिली मोठी अपडेट

Last Updated:

दिल्ली आणि बंगळुरूतील 40 शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या आल्या आहेत. ईमेलद्वारे पाठवणाऱ्याने मानसिक आरोग्याच्या संघर्षांबद्दल बोलत धमकी दिली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

News18
News18
शाळांना टार्गेट करुन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याच्या घटना मागच्या काही दिवसांपासून घडत आहेत. नुकतंच दिल्लीमध्ये 45 शाळांना बॉम्बच्या धमक्या आल्या होत्या. आता पुन्हा एकदा ई मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी 40 शाळांना आली आहे. रोजच्या या धमक्या आता चिंतेची बाब बनत आहेत. या वेळी 'roadkillmentalhospital@atomicmail.io' या ईमेल आयडीवरून हा मेल आला आहे. ईमेलमध्ये पाठवणारा त्याच्या 'मानसिक आरोग्याच्या संघर्षां'बद्दल बोलत असल्याचा उल्लेख आहे.
हॅलो. मी शाळेच्या वर्गांमध्ये अनेक स्फोटक उपकरणे (ट्रायनायट्रोटोल्यूइन) ठेवली आहेत. ही स्फोटके काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये चतुराईने लपवलेली आहेत. या धमकीच्या ईमेलमध्ये विचलित करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ज्यात पाठवणाऱ्याने मानसिक आरोग्याबद्दलचा आपला राग आणि निराशा व्यक्त केली. त्याने मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे आणि मानसोपचार औषधांच्या परिणामांवर टीका केली आहे. या तक्रारींसोबत, त्याने बदला म्हणून शाळकरी मुलांचा जीव घेण्याची धमकी दिली आहे.
advertisement
बंगळुरू इथल्या 40 शाळांना हा मेल आला. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर आहे. दिल्ली आणि बंगळुरूमधील शाळांमध्ये तपासणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून दिल्लीतील शाळांना वारंवार बॉम्बच्या धमक्या येत आहेत. सर्व शाळांचे कॅम्पस रिकामे करून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे बंगळुरू इथे मेल पाठवणारा रोडकिल नावाचा व्यक्ती असल्याचं मेलवरुन दिसत आहे.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, ईमेल पाठवणाऱ्याने त्याचे नाव 'roadkill333@atomicmail.io' असे दिले आहे. त्याने शाळांमध्ये अनेक बॉम्ब ठेवल्याचा दावा केला आहे. त्याने असेही म्हटले आहे की तो मुलांच्या मृत्यूनंतर मी स्वत:चं आयुष्य संपवेन. मी या सगळ्या मुलांना संपवून टाकीन, एकही जीवंत राहणार नाही. जेव्हा मी बातम्या पाहीन आणि पालक त्यांच्या मुलांचे थंड, विकृत मृतदेह पाहण्यासाठी शाळेत येतील तेव्हा मला आनंद होईल." ईमेल पाठवणाऱ्याने मानसोपचारतज्ज्ञांवरही राग व्यक्त केला. रेडकिल नावाचा व्यक्ती अद्याप सापडलेला नाही. पोलिसांकडून हा मेल कुठून आला, त्याचा तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
40 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, विद्यार्थ्यांसह पालकांचे टेन्शन वाढले; पोलिसांनी दिली मोठी अपडेट
Next Article
advertisement
BJP Eknath Shinde : मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा
मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र
  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

View All
advertisement