Arvind Kejriwal : दिल्लीत मोठा उलटफेर, अरविंद केजरीवालांचा पराभवाचा धक्का
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Arvind Kejriwal lost : नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे.
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मोठा धक्का आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा सुमारे दोन हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे.
भाजपने सध्या बहुमताचा आकडा पार केला असून 46 जागांवर आघाडी मिळवली आहे. सलग तीन वेळा दिल्ली काबीज करणाऱ्या आम आदमी पार्टीला यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे. आप केवळ 22 जागांवर आघाडीवर आहे.
नवी दिल्ली मतदारसंघात चुरशीची लढत झाली. आपच्या अरविंद केजरीवाल यांना भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचे आव्हान होते. संदीप दीक्षित हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. अरविंद केजरीवाल यांचा सुमारे 1800 मतांच्या फरकाने पराभव झाला. याच मतदारसंघात काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4000 च्या आसपास मते मिळाली.
advertisement
अरविंद केजरीवाल यांनी 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी केजरीवालांनी दीक्षितांचा पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसची या मतदारसंघात पिछेहाट दिसून आली.
मनीष सिसोदियांचाही पराभव...
आपचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. जंगपुरा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सिसोदिया हे तीन टर्मचे आमदार असून केजरीवाल सरकारमधील ते महत्त्वाचे नेते होते. दिल्लीतील शिक्षण व्यवस्था सुधारवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, अलीकडेच दिल्ली मद्य धोरण घोटळ्यात मनीष सिसोदिया अडकले. त्यांना जेलवारी देखील झाली होती. सिसोदिया हे जामिनावर बाहरे आहेत. सिसोदिया यांना अगदी थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
advertisement
दिल्लीत कमळ फुललं...
2014 सालापासून देशात भाजपची सत्ता असूनही दिल्ली विजयाचं भाजपाचं स्वप्नं काही साकार झालेलं नव्हतं, त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत भाजपाने आपली सर्व ताकद पणाला लावली. 2013, 2015 आणि 2020 असं सलग तीन वेळा आम आदमी पक्षाने निर्विवाद यश मिळवल होतं. आता दिल्लीत भाजपचं कमळ फुलताना दिसत आहे. जवळपास 26 वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेत भाजप पुनरागमन करणार आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
February 08, 2025 12:47 PM IST