Priyanka Gandhi : 30 वर्षांची राजकीय कारकीर्द, पहिल्यांदाच निवडणूक लढणार प्रियांका गांधी, तारीख ठरली

Last Updated:

Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पण त्यांनी कोणतीही निवडणूक मात्र लढवलेली नाही.

News18
News18
दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या दोन राज्यांच्या  निवडणुकांसोबतच देशातील काही ठिकाणच्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची पोटनिवडणूकही होणार आहे. यात केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वायनाडमध्येही २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. वायनाडमधून प्रियांका गांधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात एन्ट्री करणार आहेत. इथून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विजय मिळवला होता. पण त्यांनी रायबरेलीतून खासदार राहण्याचा पर्याय निवडलाय. यामुळे आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी मैदानात उतरतील. आतापर्यंत पडद्यामागे राहिलेल्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. (Priyanka Gandhi)
राहुल गांधी यांनी वायनाडमधून २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यांना तेव्हा अमेठीत पराभवाचा धक्का बसला होता. तर आता २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीत जिंकून आले. त्यांना वायनाड ऐवजी रायबरेलीचा खासदार होण्याचा पर्याय निवडला.
राहुल गांधी यांनी वायनाडची खासदारकी सोडल्यामुळे ही जागा रिक्त झालीय. या जागी प्रियांका गांधी मैदानात उतरणार आहेत. वायनाड हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ असून तिथं मुस्लीम मतदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला. या निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेसनेच बाजी मारलीय.
advertisement
प्रियांका गांधी गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पण त्यांनी कोणतीही निवडणूक मात्र लढवलेली नाही. पहिलीच निवडणूक त्या वायनाडमधून लढणार आहेत. वायनाड हा केरळमधला जिल्हा असून यात मल्लप्पुरम आणि कोझीकोड जिल्ह्यातील काही भाग आहे. वायनाड जवळपास ५० टक्के हिंदू तर २१ टक्के ख्रिश्चन आणि २९ टक्के मुस्लिम आहेत. पण वायनाड मतदारसंघाबाबत बोलायचं तर ४८ टक्के मुस्लिम मतदार आणि ४१ टक्के हिंदू मतदार आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
Priyanka Gandhi : 30 वर्षांची राजकीय कारकीर्द, पहिल्यांदाच निवडणूक लढणार प्रियांका गांधी, तारीख ठरली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement