हातात वडिलांच्या अस्थी, डोळ्यात पाणी, इंडिगोच्या भोंगळ कारभारासमोर हतबल झाली मुलगी, Emotional VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Indigo ने अचानक फ्लाइट रद्द केल्याने Namita हरिद्वारला वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी वेळेत पोहोचू शकली नाही, त्यामुळे ती केम्पेगौडा विमानतळावर हतबल झाली.
वडिलांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारानंतर गंगेत अस्थी घेऊन हरिद्वारला विसर्जनासाठी निघालेल्या नमिता यांची सध्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्यंत वाईट अवस्था झाली. इंडिगोने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक विमानं रद्द केली, आज सलग तिसऱ्या दिवशी हे घडलं. इंडिगोच्या भोंगळ कारभारामुळे नमिता यांचं मोठं नुकसान झालं आहे. हरिद्वारला वडिलांच्या अस्थी विसर्जनाला वेळेत पोहोचता येणार नाही. अस्थी विसर्जनाचे विधी शुक्रवारीअसल्याने नमिता यांची हतबल झाल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना नमिता यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माझ्या हातात वडिलांच्या अस्थी आहेत. मला बंगळुरूवहून दिल्लीला जायचं आहे. दिल्लीहून पुन्हा देहारादून आणि तिथून हरिद्वारला अस्थी विसर्जन करण्यासाठी जायचं आहे. मात्र इंडिगोने आता नुकतीच अनाउन्समेंट केली की विमानं रद्द करण्यात आली आहेत.
त्यांनी याची याआधी कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यांनी अचानक फ्लाइट रद्द केली, आज आमच्याकडून कोणतेही विमान उड्डाण होणार नाही. तुम्हाला जर आजच जायचं असेल तर इतर एअरलाइन्सने प्रवास करावा यासाठी फोर्स करत आहेत. मात्र त्यांची तिकीटं 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत जातात जे आम्हाला परवडणारे नाहीत. आम्ही पाच लोक आहोत.
advertisement
#WATCH | Bengaluru, Karnataka | Namita, stranded at Kempegowda International Airport while on her way to Haridwar for her father's 'Asthi Visarjan', says, "I have my father's 'Asthi' (mortal remains post cremation) with me. I have to reach Delhi from Bengaluru. Board a flight to… https://t.co/PeIlIuByBY pic.twitter.com/5kw8tnixqX
— ANI (@ANI) December 5, 2025
advertisement
आता इथून जाण्यासाठी ना बसचं तिकीट मिळतंय ना ट्रेनचं. आम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं. मात्र जोधपूर राजस्थान आणि मग हरिद्वार असं करत जावं लागलं असतं, आता हरिद्वारला जाणं कठीण झालं आहे. रिफंडही आम्हाला पूर्ण दिला जाणार नाही असं सांगितलं जात आहे.
7 दिवसांनंतर रिफंड दिला जाईल असं इथे सांगितलं जात आहे. माझ्या हातात माझ्या वडिलांच्या अस्थी आहेत ज्या विसर्जित करणं फार महत्त्वाचं आहे. हे बोलताना तीचा कंठ दाटून आला होता. तिने सरकारला विनंती केली की मला काहीतरी अरेंज करून द्या ज्यामुळे मी माझ्या वडिलांच्या अस्थी वेळेत विसर्जित करू शकेन.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 1:47 PM IST
मराठी बातम्या/देश/
हातात वडिलांच्या अस्थी, डोळ्यात पाणी, इंडिगोच्या भोंगळ कारभारासमोर हतबल झाली मुलगी, Emotional VIDEO


