Fire At Maha Kumbh: महाकुंभ मेळ्यात शॉर्ट सर्किट! सेक्टर 18 आणि 19 मध्ये अग्नितांडव, वाचा अपडेट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Fire At Maha Kumbh: महाकुंभ मेळ्यातील सेक्टर 18 आणि 19 मध्ये शनिवारी मोठी आग लागल्याचे समोर आले आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
प्रयागराज: महाकुंभ मेळ्यातील सेक्टर 18 आणि 19 मध्ये शनिवारी मोठी आग लागल्याचे समोर आले आहे. या भागातील अनेक मंडपांना आग लागल्याने मेळ्यातील भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाकुंभ क्षेत्रात वारंवार आगीच्या घटना
यापूर्वीही महाकुंभ मेळा क्षेत्रात अनेकदा आगीच्या घटना घडल्या आहेत. ९ फेब्रुवारी रोजी सेक्टर-२३ मधील एका अन्न स्टॉलमध्ये आग लागली होती, ज्यामध्ये अनेक मंडप जळून खाक झाले होते. प्राथमिक तपासात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
Viral: शांत समुद्रात घडला थरारक प्रसंग, २४ वर्षीय तरुणाला व्हेलने गिळले, नंतर...
VIDEO | Prayagraj: Fire breaks out at ashram in Sector 19 of the Maha Kumbh area. Fire tenders at spot. More details awaited. #MahaKumbhWithPTI pic.twitter.com/qos9onBydL
— Press Trust of India (@PTI_News) February 15, 2025
advertisement
त्याचप्रमाणे ७ फेब्रुवारी रोजी सेक्टर-१८ मधील एका शिविराला आग लागली होती, ज्यात अनेक तंबू जळाले. फायर ब्रिगेडच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली.
याआधीही मोठ्या प्रमाणावर नुकसान
३० जानेवारीला सेक्टर-२२ मध्ये १५ टेंट जळून खाक झाले होते.
१९ जानेवारीला सेक्टर-१९ मध्ये एका शिविरातील गवताने पेट घेतल्याने १८ शिविर जळाले होते.
advertisement
या आगीच्या घटनांमुळे महाकुंभ मेळ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. फायर ब्रिगेडने वेळीच कारवाई करत परिस्थिती आटोक्यात आणल्याने प्रत्येक वेळी जीवितहानी टळली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 15, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/देश/
Fire At Maha Kumbh: महाकुंभ मेळ्यात शॉर्ट सर्किट! सेक्टर 18 आणि 19 मध्ये अग्नितांडव, वाचा अपडेट