G20 Summit 2023: G20 मध्ये युक्रेन मुद्द्यावर एकमत: 200 तास चर्चा, 300 बैठका, 15 मसुदे आणि त्यामागील 4 चेहरे

Last Updated:

जी20 चा सर्वात कठीण भाग म्हणजे भू-राजकीय परिच्छेद (रशिया-युक्रेन) वर एकमत निर्माण करणं. पण ते करण्यासाठी 200 तासांची नॉन-स्टॉप चर्चा, 300 द्विपक्षीय बैठका आणि 15 पेक्षा जास्त मसुदे लागले

G20 मध्ये युक्रेन मुद्द्यावर एकमत
G20 मध्ये युक्रेन मुद्द्यावर एकमत
नवी दिल्ली 10 सप्टेंबर : राजनैतिक व्यासपीठावरील आणखी एका विजय मिळवत, भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान नवी दिल्ली घोषणापत्र जारी करण्याचा करार झाला. रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित मुद्द्यांवर एकमत होत नव्हतं, परंतु भारताने या जाहीरनाम्याची भाषा अशी ठेवली, की यातही विरोधी पक्षांचे विचार एकत्र आले. याबद्दल पंतप्रधान मोदींनी शेरपा यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, G20 शेरपा अमिताभ कांत यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली असून त्यांच्या टीममधील दोन सदस्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'जी20 चा सर्वात कठीण भाग म्हणजे भू-राजकीय परिच्छेद (रशिया-युक्रेन) वर एकमत निर्माण करणं. पण ते करण्यासाठी 200 तासांची नॉन-स्टॉप चर्चा, 300 द्विपक्षीय बैठका आणि 15 पेक्षा जास्त मसुदे लागले. यात मला दोन प्रतिभावान अधिकाऱ्यांनी खूप मदत केली - @NagNaidu08 आणि @eenamg.
युक्रेन संघर्ष आणि हवामान बदलाशी निगडित मतभेदांमुळे सहमती गाठण्याची आव्हानं पाहता G20 ने नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारणं हा भारताचा मोठा विजय म्हणून पाहिला जात आहे.
advertisement
नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “माझ्याकडे चांगली बातमी आहे, आपल्या टीमच्या कठोर परिश्रमामुळे, नवी दिल्ली घोषणापत्रावर G20 नेत्यांचं एकमत झालं आहे. मी या घोषणेचा अवलंब करत असल्याची घोषणा करतो. या निमित्ताने मी आमच्या शेरपांचं, मंत्र्यांचं अभिनंदन करतो, ज्यांनी यासाठी कठोर परिश्रम केले आणि हे शक्य करून दाखवलं.”
advertisement
युक्रेन सारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्याच्या त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या कार्याबद्दल G20 शेरपाला मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनीही त्यांचं कौतुक केलं. संयुक्त राष्ट्रांमध्ये अंडर सेक्रेटरी जनरल म्हणून काम केलेल्या थरूर यांनी कांत यांचे कौतुक करत भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.
view comments
मराठी बातम्या/देश/
G20 Summit 2023: G20 मध्ये युक्रेन मुद्द्यावर एकमत: 200 तास चर्चा, 300 बैठका, 15 मसुदे आणि त्यामागील 4 चेहरे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement