G20 Summit 2023: 'तुम्हाला पाहून खूप आनंद झाला...' पंतप्रधान मोदींना पाहून असं का म्हणाले जो बायडन?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
G20 Summit 2023 in Delhi: यावेळी त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 या अंतराळ मोहिमेबाबतही अभिनंदनही केलं. जो बायडन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
नवी दिल्ली : भारतात G20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने जो बायडन भारतात आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत पोहोचले. विमानतळावरून उतरल्यानंतर जो बियडन थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचले. यादरम्यान दोघांनी डिनर आणि द्विपक्षीय चर्चा केली. दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी भारत-अमेरिकेत द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये कायम सदस्यत्व, चांद्रयान-3 मोहिमेबाबतही चर्चा झाली. 2024 च्या सुरुवातीच्या महिन्यांत क्वाड सदस्य देशांची बैठक आयोजित केली जाणार आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश या क्वाड गटात आहे.
पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 या अंतराळ मोहिमेबाबतही अभिनंदनही केलं. जो बायडन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
advertisement
Great seeing you, Mr. Prime Minister.
Today, and throughout the G20, we'll affirm that the United States-India partnership is stronger, closer, and more dynamic than any time in history. pic.twitter.com/bEW2tPrNXr
— President Biden (@POTUS) September 8, 2023
पंतप्रधान महोदय, तुम्हाला पाहून आनंद झाला. आज आणि G20 दरम्यान, युनायटेड स्टेट्स-भारत यांच्यातील भागीदारी इतिहासातील कोणत्याही काळापेक्षा अधिक मजबूत, जवळची आणि अधिक गतिमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
दोन्ही देशांच्यावतीने संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. संयुक्त निवेदनानुसार, बायडन यांनी अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याबाबत भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या विनंती पत्राचं स्वागत केलं आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
September 09, 2023 9:43 AM IST
मराठी बातम्या/देश/
G20 Summit 2023: 'तुम्हाला पाहून खूप आनंद झाला...' पंतप्रधान मोदींना पाहून असं का म्हणाले जो बायडन?