गगनयानची तारीख ठरली, चंद्रावर माणूस कधी पाठवणार भारत? ISRO प्रमुखांनी दिली माहिती

Last Updated:

भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम गगनयान २०२४ च्या शेवटी किंवा २०२५ मध्ये लाँच केली जाण्याची अपेक्षा होती. पण याची तारीख बदलण्यात आली आहे.

News18
News18
दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर चंद्रयान ४ आणि गगनयान मोहिमेवर वेगाने काम करत आहे. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम गगनयान २०२४ च्या शेवटी किंवा २०२५ मध्ये लाँच केली जाण्याची अपेक्षा होती. पण याची तारीख बदलण्यात आली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शनिवारी ऑर इंडिया रेडिओवर सरदार पटेल मेमोरियल लेक्चरमध्ये भारताच्या आगामी मोहिमेबद्दल माहिती दिली.
भारताच्या बहुप्रतीक्षित अशा गगनयान मोहिमेबद्दल एस सोमनाथ यांनी सांगितले. मानवरहित अंतराळ मोहिम गगनयान २०२६ मध्ये लाँच होईल. तर चंद्रयान ४ मोहिम २०२८ पर्यंत लाँच होऊ शकते. चंद्राच्या भूमीवरचे नमुने आणण्यासाठी ही मोहिम असणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातली प्रलंबित मोहिम निसार पुढच्या वर्षीपर्यंत लाँच केली जाऊ शकते. निसार मोहिमेत एक रडार मशीन आहे. यात पृथ्वीच्या भूभागावर पर्यावरणीय बदल आणि नैसर्गिक संकटे, घटना यांची माहिती गोळा करण्याचं काम याअंतर्गत होणार आहे.
advertisement
इस्रो अध्यक्षांनी खुलासा केला की जपानची अंतराळ संस्था जेएक्सएसोबत संयुक्त चंद्रमा लँडिंग मिशन ज्याला ल्युपेक्स किंवा लूनर पोलर एक्सप्लोरेशन असं नाव दिलं गेलं होतं. आता ते मिशन चंद्रयान ५ असं असेल. या मोहिमेची वेळ इस्रो प्रमुखांनी सांगितली नाही. पण ते चंद्रयान ५ असेल सांगितलं.
चंद्रयान ४ एक मोठं आणि महत्त्वाचं मिशन असणार आहे. यात लँडर भारताचा तर रोवर जपानचा असेल. चंद्रयान ३ वर रोवरचं वजन फक्त २७ किलो इतकं होतं. या मोहिमेत रोवरचं वजन तब्बल ३५० किलो इतकं असेल. ही मोहिम भारताला चंद्रावर मानव पाठवण्याच्या मोहिमेच्या जवळ घेऊन जाणारी असेल. भारताने २०४० पर्यंत चंद्रावर मानवरहित यान पाठवण्याच्या योजनेचं अनावरण केलंय.
view comments
मराठी बातम्या/देश/
गगनयानची तारीख ठरली, चंद्रावर माणूस कधी पाठवणार भारत? ISRO प्रमुखांनी दिली माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement