अदृश्य पाणबुडी, घातक प्रहार; भारताच्या K-4 चाचणीने जगाला इशारा,शत्रूला कळणारही नाही आणि हल्ला होईल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Ballistic Missile: बंगालच्या उपसागरात INS अरिघातवरून K-4 सबमरीन-लाँच्ड बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी करून भारताने सामरिक ताकदीचा मोठा इशारा दिला आहे. 3,500 किमी पल्ल्याच्या या अणु-मिसाईलमुळे भारताची ‘सेकंड स्ट्राइक’ क्षमता अधिक भक्कम झाली आहे.
नवी दिल्ली: भारताने बंगालच्या उपसागरात INS अरिघात (INS Arighaat) या पाणबुडीवरून 'K4' या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीत क्षेपणास्त्राने सुमारे 3,500 किलोमीटरचा आपला पूर्ण पल्ला गाठला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही याच पाणबुडीवरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. भारताची तिसरी अण्वस्त्रवाहू पाणबुडी असलेल्या 'INS अरिघात'चा समावेश गेल्या वर्षीच नौदलात करण्यात आला असून, यामुळे भारताच्या सागरी संरक्षणाला मोठी बळकटी मिळाली आहे.
advertisement
K4 क्षेपणास्त्र हे भारताच्या अण्वस्त्र सज्जतेचा (Nuclear Triad) एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताची समुद्राखालून 'दुसऱ्या हल्ल्याची क्षमता' (Second-Strike Capability) अधिक मजबूत झाली आहे. याचा अर्थ असा की, जर शत्रूने भारताच्या जमिनीवरील अण्वस्त्र तळांना लक्ष्य केले, तरीही समुद्रात खोलवर दडलेल्या या पाणबुड्या शत्रूवर चोख प्रत्युत्तर देऊ शकतात. अणू-ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या अत्यंत शांत असतात आणि त्या अनेक महिने पाण्याखाली राहू शकत असल्याने शत्रूला त्या शोधणे कठीण जाते.
advertisement
या क्षेपणास्त्रामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात लांब पल्ल्याच्या शत्रूंविरोधात भारताचा दबदबा वाढला आहे. 750 किमी पल्ल्याच्या 'K15 सागरिका' आणि भविष्यात येणाऱ्या अधिक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमधील अंतर या K4 क्षेपणास्त्राने भरून काढले आहे. समुद्रातून मारा करण्याची ही उच्च क्षमता भारताच्या दीर्घकालीन संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा आधार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/देश/
अदृश्य पाणबुडी, घातक प्रहार; भारताच्या K-4 चाचणीने जगाला इशारा,शत्रूला कळणारही नाही आणि हल्ला होईल










