भारताचा POK वर हल्ला, पहलगामचा बदला घेतला, पाकिस्तानला मिरच्या लागतील अशी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Operation Sindoor: भारताच्या एअर स्ट्राईकवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : भारत सरकारने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील ९ ठिकाणांना लक्ष्य केल्याचे सांगितले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील ५ अतिरेकी अड्ड्यांवर तर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ४ अतिरेकी शिबिरांवर भारतीय वायूदलाने क्षेपणास्त्र डागत हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंतच्या पूर्वानुभवावरून भारत काहीतरी मोठे करेन हे मला माहिती होते, अशी पहिली प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
भारताचा पाकवर स्ट्राईक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले...
ओव्हलच्या दरवाजातून आत येत होतो, त्यावेळी मी भारताच्या एअर स्ट्राईकबद्दल ऐकले. पहलगामच्या हल्ल्यात ज्या प्रकारे २६ निष्पाप लोकांना मारले गेले आणि त्यानंतर भारतीय लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला ते पाहता काहीतरी होईल, असे वाटत होते. भारत दहशतवादाविरोधात खूप मोठ्या काळापासून, काही दशकांपासून लढतोय. अपेक्षा आहे की भारतावरचं दहशतवादाचं संकट लवकरच संपुष्टात येईल, असे ट्रम्प म्हणाले.
advertisement
#WATCH | #OperationSindoor | US President Donald Trump's first comments on Indian strikes inside Pakistan.
US President says "It's a shame. We just heard about it as we were walking in the doors of the Oval. I guess people knew something was going to happen based on a little bit… pic.twitter.com/KFdNC1OCJT
— ANI (@ANI) May 6, 2025
advertisement
यादरम्यान पाकिस्तानने भारतीय हल्ल्याची कबुली दिली आहे. भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांनी बहावलपूरच्या मुझफ्फराबाद, कोटली आणि अहमद पूर्व भागाला लक्ष्य केले आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक (डीजी आयएसपीआर) लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी संताप व्यक्त करत म्हटले की काही वेळापूर्वी भारताने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील कोटली आणि मुझफ्फराबादमधील तीन ठिकाणी हवाई हल्ले केले.
advertisement
पाकिस्तान वायूदलाचे F16 विमान भारताने पाडलं
पहलगाम ते पंपोर परिसरातील एका शाळेच्या छतावर पाकिस्तानी वायूदलाचे F16 लढाऊ विमान भारतीय वायुदलाने अचूक मारा करत पाडलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील ५ अतिरेकी अड्ड्यांवर तर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ४ अतिरेकी शिबिरांवर भारतीय वायूदलाने क्षेपणास्त्र डागत हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानच्या मुख्य भूमीवरील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील अतिरेकी शिबिरांवर भारतीय वायूदलाने एअर स्ट्राईक करत क्षेपणास्त्र डागले आहे. बहावलपूर येथील अतिरेकी शिबीर जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद चालवत होता. याच अतिरेकी शिबिराला भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी लक्ष्यभेद केलंय.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
May 07, 2025 4:53 AM IST
मराठी बातम्या/देश/
भारताचा POK वर हल्ला, पहलगामचा बदला घेतला, पाकिस्तानला मिरच्या लागतील अशी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया


