हनीमून राजासोबत पण नोकरात अडकला जीव, सोनम बेवफा कशी झाली? इंदौरच्या रघुवंशी हत्याकांडात मोठा ट्विस्ट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Indore Couple Missing Case: मेघालयातील शिलाँगमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या जोडप्याबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे.
Indore Couple Missing Case: मेघालयातील शिलाँगमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या जोडप्याबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे. सोमवारी पहाटे उत्तरप्रदेशातील गाझीपूरमधून पोलिसांनी सोनम रघुवंशीला अटक केली. यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशातून सोनमच्या तीन साथीदारांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सोनमनं नोकरासोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.
पोलिसांनी आतापर्यंत सोनमसह विशाल सिंग, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत अशा चौंघाना अटक केली आहे. चौघांकडे चौकशी केली असता सोनमची राज कुशवाह नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. यातूनचं सोनमने आपला प्रियकर राजला हाताशी धरून पती राजा रघुवंशीची हत्या केली. राजने या कटात विशाल, आनंद आणि आकाश अशा तीन मित्रांना देखील सामावून घेतलं. या सर्वांनी शिलाँगमध्ये राजाची हत्या केली. यानंतर त्यांनी राजाचा मृतदेह दरीत फेकून दिला.
advertisement
5 वर्षांनी लहान तरुणासोबत प्रेमप्रकरण
सोनम आणि राजाचे लग्न ११ मे रोजी झालं होतं. लग्नानंतर अवघ्या सहाच दिवसात सोनमने प्रियकर राजसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला. राजने त्याचे मित्र विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांनाही कटात सहभागी करून घेतली. प्लॅननुसार त्यांना गुवाहाटीला पाठवले. राज कुशवाह हा सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.
advertisement
लग्नानंतर सहाच दिवसांत पतीच्या हत्येचा रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार, सोनमचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. याच दुकानात राज कुशवाह बिलिंग एजंट म्हणून काम करतो. दुकानात बिलिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या राजवर सोनमला प्रेम झालं. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध सुरु होते. दरम्यान, सोनमचा ११ मे रोजी राजासोबत विवाह झाला. यानंतर अवघ्या सहाच दिवसांत सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला. प्लॅननुसार, राजने त्याचे मित्र विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांना तयार केले आणि सर्वांना गुवाहाटीला पाठवलं.
advertisement
नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न
जेव्हा सोनम आणि राजा शिलाँगला आले. तेव्हा ते तिघेही तिथे आले. त्यांनी एक बाईक भाड्याने घेतली. दोघांचा पाठलाग केला. प्लॅननुसार सोनमने राजाला डबल डेकर परिसरात नेलं. इथं सर्वांनी मिळून राजाची हत्या केली. पतीच्या हत्येनंतर सोनम नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. ती वाराणसीहून गोरखपूरला बसने प्रवास गेली होती. तिला गोरखपूरहून नेपाळला पळून जायचे होते. पण १७ व्या दिवशी तिने घरी फोन करून आपण उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथं असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 09, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/देश/
हनीमून राजासोबत पण नोकरात अडकला जीव, सोनम बेवफा कशी झाली? इंदौरच्या रघुवंशी हत्याकांडात मोठा ट्विस्ट