आजच्या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष; सलग 120 तास उपाशी राहिलेले नारायण मूर्ती, सांगितल्या त्या आठवणी
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
नारायण मूर्ती यांच्यावर युरोपमध्ये तब्बल 120 तास उपाशी राहण्याची वेळ आली होती. मूर्ती यांनीच याबाबत खुलासा केलाय.
नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीकडे आज जरी मुबलक पैसा दिसत असला तरी त्याच्यावरही एकवेळी उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली होती, असं तुम्ही बऱ्याचवेळा ऐकलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्यावर युरोपमध्ये तब्बल 120 तास उपाशी राहण्याची वेळ आली होती. मूर्ती यांनीच याबाबत खुलासा केलाय.
‘झी न्यूज हिंदी’ने या बाबत वृत्त दिलंय. भारतातील अव्वल श्रीमंतांपैकी एक असलेले आयटी क्षेत्रातील दिग्गज नारायण मूर्ती यांना 50 वर्षांपूर्वी युरोपमध्ये सलग 120 तास उपाशी राहावं लागलं होतं. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघ आणि भारताच्या स्थायी मिशननं आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात मूर्ती यांनी ही माहिती दिली. हा कार्यक्रम भारतीय स्वयंसेवी संस्था 'अक्षय पात्र फाउंडेशन' ने चार अब्जावं भोजन देण्याच्या निमित्तानं आयोजित केला होता.
advertisement
या कार्यक्रमामध्ये मूर्ती यांनी भारताबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. ते म्हणाले,'येथे बहुतेक भारतीयांना आणि मलाही भारत सरकारमुळे उत्तम दर्जाचं शिक्षण मिळालं आहे. त्यामुळे आज सुसंस्कृत लोक म्हणून आपण आपल्या राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. यासोबतच असहाय, गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी मदत केली पाहिजे.’
म्हणून उपाशी राहण्याची आली वेळ
नारायण मूर्ती यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, ‘सुमारे 50 वर्षांपूर्वी मी युरोपमध्ये फिरत असताना मला सलग तब्बल 120 तास उपासमार सहन करावी लागली. तुमच्यापैकी अनेकांनी उपाशी राहणं काय असते, हे अनुभवलं नसेल. पण मी स्वतः ते युरोपमध्येच अनुभवलं आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी मी युरोपमधील निश नावाच्या शहरात जात होतो. हे शहर बुल्गारिया आणि तत्कालीन युगोस्लाव्हिया व आजचे सर्बिया यांच्या सीमेवर वसलेलं आहे. हा प्रवास करताना माझ्याकडे खायला काहीच नव्हते, त्यामुळे मला सुमारे 120 तास उपाशी राहावं लागलं होतं.’
advertisement
दरम्यान, नारायण मूर्ती हे त्यांच्या वक्तव्यामुळे सातत्यानं चर्चेत असतात. भारतीय तरुणांना त्यांनी आठवड्याला 70 तास काम करण्याचा सल्लाही दिला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यातच आता 50 वर्षांपूर्वी त्यांच्यावर सलग तब्बल 120 तास उपाशी राहण्याची वेळ आली होती, असं त्यांनी सांगितलं आहे. यावरून नारायण मूर्ती यांनी यशस्वी होण्यासाठी किती संघर्ष केला असेल, इन्फोसिस उभारताना त्यांना किती कष्ट करावे लागले असतील, हे समजू शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 04, 2024 3:04 PM IST
मराठी बातम्या/देश/
आजच्या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष; सलग 120 तास उपाशी राहिलेले नारायण मूर्ती, सांगितल्या त्या आठवणी


