पती-पत्नीच्या वादात निष्पाप बालकाचा गेला जीव, पहा काय आहे नेमकं प्रकरण

Last Updated:

पतीसोबत भांडण झाल्यानंतर ती सरायधेला गावात असलेल्या तिच्या माहेरच्या घरी आली होती. दोन मुले आणि एक मुलगी सह ती घराजवळून थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीजवळ पोहोचली.

पती-पत्नीच्या वादात निष्पाप बालकाचा गेला जीव, पहा काय आहे नेमकं प्रकरण
पती-पत्नीच्या वादात निष्पाप बालकाचा गेला जीव, पहा काय आहे नेमकं प्रकरण
नंद किशोर मंडल, प्रतिनिधी
पाकुड़, 13 ऑगस्ट : पाकुरच्या मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील नरोत्तमपूर गावात असलेल्या बहियारमध्ये एका महिलेने आपल्या 4 वर्षाच्या आजारी मुलाला विहिरीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. मात्र, महिलेला तिच्या इतर दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या करायची होती. मात्र आजूबाजूच्या लोकांनी तिला पकडले. याठिकाणी पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आहे.
advertisement
ज्योत्स्ना देवी असे या महिलेचे नाव असून साहिबगंज जिल्ह्यातील इटवाडांगा, बरहरवा येथील तरुण राजवार याची पत्नी आहे. पतीसोबत भांडण झाल्यानंतर ती सरायधेला गावात असलेल्या तिच्या माहेरच्या घरी आली होती. दोन मुले आणि एक मुलगी सह ती घराजवळून थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीजवळ पोहोचली. तिने प्रथम तिच्या धाकट्या मुलाला विहिरीत फेकले, त्यानंतर इतर दोघांही मुलासह उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या लोकांनी विहिरीजवळ पोहोचून तिला पकडले.
advertisement
मृत बालक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या होते दुर्बल :
ज्योत्स्ना यांनी सांगितले की, लहान मुलगा जन्मापासूनच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. नवरा मोलमजुरी करून घर चालवतो. आर्थिक विवंचनेमुळे मुलावर उपचार होऊ शकले नाहीत. यावरून पतीसोबत भांडण झाले. या कारणामुळे तिला मुलासह आत्महत्या करायची होती.
पती-पत्नीमध्ये झाला वाद  : 
दुसरीकडे, मुफसिल पोलिस स्टेशनचे प्रभारी सतीश कुमार यांनी सांगितले की, पती-पत्नीमधील वादातून महिलेने हे पाऊल उचलले. मृत मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या/देश/
पती-पत्नीच्या वादात निष्पाप बालकाचा गेला जीव, पहा काय आहे नेमकं प्रकरण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement