ISRO चं भारताला न्यू इअर गिफ्ट, SPADEX चं यशस्वी प्रक्षेपण, भारत बनला चौथा देश!

Last Updated:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्त्रोनं सोमवारी महत्त्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग (SPADEX) मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे

News18
News18
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्त्रोनं सोमवारी महत्त्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग (SPADEX) मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. ज्यामध्ये प्रक्षेपण वाहनात 24 प्रयोग करण्यात आले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) 220 किलो वजनाच्या दोन उपग्रहांसह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. याआधी, पृथ्वीच्या वरच्या त्याच कक्षेत असलेल्या इतर उपग्रहांशी टक्कर टाळण्यासाठी प्रक्षेपण केवळ दोन मिनिटे उशीर झाला होता.
advertisement
advertisement
या मोहिमेच्या यशामुळे भारत हा पराक्रम करणारा जगातला चौथा देश ठरला आहे. इस्त्रोच्या या मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
SPADEX मोहिमचं महत्त्वं
स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान भारताच्या अंतराळ महत्वाकांक्षा नवीन उंचीवर नेणार आहे. हे तंत्रज्ञान चंद्रावर मानवाच्या मोहिमेसाठी, तेथून नमुने परत आणण्यासाठी आणि भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक - 'भारतीय स्पेस स्टेशन' बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर मोहिमांमध्ये देखील केला जाईल जिथे एकापेक्षा जास्त रॉकेट प्रक्षेपित करण्यास मदत होणार आहे. 
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
मराठी बातम्या/देश/
ISRO चं भारताला न्यू इअर गिफ्ट, SPADEX चं यशस्वी प्रक्षेपण, भारत बनला चौथा देश!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement