एनडीएचं ठरलं, उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातला माणूस, भाजपकडून घोषणा

Last Updated:

Vice President Election Candidate: आरोग्याचे कारण देऊन राजीनामा दिलेले मावळते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असणार, याकडे अनेकांचे लक्ष होते.

अमित शाह-जेपी नड्डा-नरेंद्र मोदी
अमित शाह-जेपी नड्डा-नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार ठरला असून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची घोषणा भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाशी चर्चा करून प्रचंड विचारांती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर एकमत झाले.
आरोग्याचे कारण देऊन राजीनामा दिलेले मावळते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. गेल्या दोन आठवड्यांपासून नव्या उमेदवाराच्या शोधासाठी भाजपने वेळ घेतला. दरम्यानच्या काळात विविध राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून अनेक राज्यातील ज्येष्ठ नेत्यांचा उपराष्ट्रपतीपदासाठी विचार झाला. अखेर सीपी राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवार समितीचे प्रमुख जेपी नड्डा यांनी जाहीर केले.
advertisement
advertisement

सीपी राधाकृष्णन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली होती 

अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे सीपी राधाकृष्णन यांनी ११ ऑगस्टला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली होती. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत, त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी एमके स्टॅलिन हे रुग्णालयात होते.  स्टॅलिन यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचे सीपी राधाकृष्णन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले होते.
advertisement

डीएमके सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार का?

सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूचे असल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये असलेली स्टॅलिन यांची डीएमके एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement

कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन?

सी. पी. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत
आधी त्यांनी झारखंडचे राज्यपालपद भूषवले
सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडू राज्यातील आहेत
कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा लोकसभा खासदारही राहिले
तसेच तामिळनाडू राज्याचे भारतीय जनता पक्षाचे ते माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते
मराठी बातम्या/देश/
एनडीएचं ठरलं, उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातला माणूस, भाजपकडून घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement