Karur Vijay Rally Stampede : थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 39 लोकांच्या मृत्यूनंतर FIR दाखल! विजयला समन्स बजावणार?

Last Updated:

Vijay Rally Stampede FIR registered : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि त्याआधारे कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Vijay Rally Stampede FIR registered
Vijay Rally Stampede FIR registered
Karur Vijay Rally Stampede Police Action : तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम (TVK) प्रमुख आणि अभिनेत्यापासून नेते बनलेले थलपती विजय यांच्या राजकीय सभेत प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचं पहायला मिळालं. चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यात किमान 33 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. तसेच 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशातच आता तमिळगा वेत्री कळगमच्या प्रमुख नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

चेंगराचेंगरी प्रकरणात एफआयआर दाखल

करूर चेंगराचेंगरी प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि त्याआधारे कारवाई करण्यात आली आहे. साधारणपणे, इतक्या मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अलीकडेच, दुसऱ्या एका प्रमुख पक्षाने त्याच ठिकाणी प्रचार केला आणि सुरक्षेसाठी 150 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तथापि, काल तेवागाच्या प्रचार रॅलीसाठी 500 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, असं डीसीपींनी सांगितलं आहे.
advertisement

विजय यांना चौकशीसाठी बोलावणार?

विजय यांना चौकशीसाठी बोलावले जाईल का? असा सवाल विचारला गेला तेव्हा पोलिसांनी सावध उत्तर दिलं. आधी चौकशी होऊ द्या. आम्ही त्यावर आधारित निर्णय घेऊ, असं एडीजीपी डेव्हिडसन देवासिरवथ यांनी सांगितलं आहे. हा व्यस्त काळ असल्याने अपघाताची चौकशी केली जाईल आणि पुढील कारवाई जाहीर केली जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
advertisement

मला असह्य वेदना होत आहेत - विजय

दरम्यान, करूरमध्ये झालेल्या घटनेमुळे माझे हृदय तुटलं आहे. मी असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःखात आहे. करूरमध्ये जीव गमावलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून सहानुभूती आणि संवेदना व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांच्या लवकर बरे होण्याची मी प्रार्थना करतो, असं ट्विट विजय याने केलं आहे.
मराठी बातम्या/देश/
Karur Vijay Rally Stampede : थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 39 लोकांच्या मृत्यूनंतर FIR दाखल! विजयला समन्स बजावणार?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement