खंडाळ्यात रायडर्सचा धूमाकूळ! सिनेस्टाइल स्टंट सुरु, वाहनचालकांचा जीव धोक्यात
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Anis Shaikh
Last Updated:
Khandala News : खंडाळा बॅटरी हिलवर रायडर्सने केलेला जीवघेणा स्टंट पाहणाऱ्यांसाठी धोकादायक ठरला. इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात आले. स्थानिकांनी सावधगिरी बाळगावी अशी पोलिसांनी सूचना दिली आहे.
मुंबई : जुना मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील बॅटरी हिल परिसरात बाईक रायडर्सचा उच्छाद सुरू असून अनेक युवक जीव धोक्यात घालून धोकादायक स्टंट करत आहेत. या स्टंटमुळे केवळ त्यांचाच नव्हे तर इतर वाहनचालकांचाही जीव धोक्यात आला आहे.
खंडाळा बॅटरी हिलवर धोकादायक स्टंट
अनेक रायडर्स कमीत कमी वेळेत मुंबई-पुणे हे अंतर पार करण्याची स्पर्धा लावत आहेत. इतकंच नव्हे तर सोशल मीडिया, विशेषतः इन्स्टाग्रामवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे स्टंट मुद्दाम केले जातात. अशा व्हिडिओंचे शूटिंग करून ते रील्स म्हणून अपलोड केले जातात, ज्यामुळे इतर युवकांनाही अशा प्रकारे स्टंट करण्याचे आकर्षण वाटते.
advertisement
स्थानिक नागरिकांच्या मते, सुट्टीच्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटी या ठिकाणी शेकडो रायडर्स जमा होतात. मोठ्या आवाजात बाईक चालवणे, रस्त्यावर रेस लावणे आणि स्टंट करत सेल्फी किंवा व्हिडिओ बनवणे हे प्रकार नेहमीचे झाले आहेत. पोलिसांनी अधूनमधून मोहीम राबवली असली तरी पोलीस गस्त अपुरी असल्याने रायडर्स पुन्हा सक्रिय होतात.
वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, या उच्छादामुळे गंभीर अपघाताची शक्यता वाढली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सतत गस्त वाढवून हा प्रकार थांबवावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 1:48 PM IST


