Kerala Opinion Poll 2026: केरळममध्ये पुन्हा 'लाल वादळ'? भाजपच्या पदरी पुन्हा निराशा, ओपिनियन पोलचे धक्कादायक आकडे
- Published by:Sachin S
Last Updated:
ओपनियन पोलनुसार, केरळममध्ये यंदा कांटे की टक्कर असणार आहे. केरळच्या सत्तेच्या लढाईत सध्या सत्ताधारी LDF (डाव्या लोकशाही आघाडी) आणि विरोधी UDF (संयुक्त लोकशाही आघाडी) या दोन्ही पक्षांमध्ये तगडी फाईट पाहण्यास मिळणार आहे.
केरळम: केरळम विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी पाच राज्यांसह निकाल लागणार आहे. पण, या पाच राज्यांमध्ये हवा कुणाची आहे? याचा अंदाज घेण्यासाठी नेटवर्क १८ आणि Vote Vibe या संस्थेनं ओपिनियम पोल केला आहे. या ओपनियन पोलनुसार, केरळममध्ये यंदा कांटे की टक्कर असणार आहे. केरळच्या सत्तेच्या लढाईत सध्या सत्ताधारी LDF (डाव्या लोकशाही आघाडी) आणि विरोधी UDF (संयुक्त लोकशाही आघाडी) या दोन्ही पक्षांमध्ये तगडी फाईट पाहण्यास मिळणार आहे.
ओपनियन पोलच्या अंदाजानुसार, UDF ला 36.6 टक्के आणि LDF ला 36.5 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, जागांच्या बाबतीत LDF ला आघाडी मिळण्याची चिन्ह आहे. डाव्या आघाडीला 68 ते 74 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF ला 64 ते 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. NDA केरळममध्ये 14.9 टक्के मतं मिळतील आणि 1 ते 3 जागा जिंकू शकते.
advertisement
मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती?
ओपनियन पोलमध्ये काँटे की टक्कर असल्याचं चित्र आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. तर मुख्यमंत्रिपदासाठी पिनाराई विजयन आणि वी.डी. सतीशन यांच्यामध्ये खुर्चीसाठी थेट लढत आहे. 29.2 टक्के लोक विजयन यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मतं करतील, तर 29 टक्के लोकांची पसंती सतीशन यांना दिली आहे. भाजपचे राजीव चंद्रशेखर यांना 10.8 टक्के लोकांनी पसंती दिली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम (39.3%) आणि ख्रिश्चन (36.6%) मतदार सतीशन यांना पसंती देत आहेत. तर SC/ST समजावर विजयन यांची पकड मजबूत आहे त्यामुळे त्यांना सरळ फायदा होईल असं चित्र आहे.
advertisement
स्थानिक परिस्थितीचं समीकरण काय?
विधानसभेची निवडणूक ही स्थानिक मुद्यांवर लढवली जात असते. त्यामुळे उत्तर केरळममध्ये UDF 26 ते 28 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे. मध्य केरळमध्येही UDF ला 27 ते 29 जागा मिळतील. दक्षिण केरळमध्ये LDF मजबूत असून त्यांना 24 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. महागाई (19.7 टक्के), बेरोजगारी (15.6 टक्के) आणि भ्रष्टाचार (14.4 टक्के) हे मतदारांसाठी प्रमुख निवडणुकीतले मुद्दे ठरले आहे.
advertisement
काँग्रेसचं काय?
केरळममध्ये काँग्रेससाठी इतर राज्यांप्रमाणे इथं खडतर अशी परिस्थितीत आहे. पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादाचा काँग्रेसला फटकाा बसणार आहे. तब्बल ४५.५ टक्के लोकांनी काँग्रेसमधील गटबाजीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुळात स्थानिक परिस्थिती आणि केरळम लोकांची संस्कृती समजून न घेतल्याचा फटका काँग्रेसला बसेल. असं जवळपास ३०.९ टक्के लोकांनी सांगितलं.
एकूणच काय तर सध्या केरळममध्ये पिनाराई विजयन सरकारविरोधात नाराजीची लाट आहे, पण याचे परिवर्तन मतदानामध्ये होईल, अशीही शक्यता नाही. त्यामुळे इथं काँटे की टक्कर जरी असली तरी ६.७ टक्के तटस्थ राहणारे मतदार हे केरळममध्ये राजकीय भवितव्य ठरवणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 9:28 PM IST
मराठी बातम्या/देश/
Kerala Opinion Poll 2026: केरळममध्ये पुन्हा 'लाल वादळ'? भाजपच्या पदरी पुन्हा निराशा, ओपिनियन पोलचे धक्कादायक आकडे









