advertisement

Parliament Security Breach: लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदारांनी पकडलं, नंतर घडलं भयानक LIVE VIDEO

Last Updated:

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन व्यक्ती सभागृहात शिरल्या, यातल्या एकची खासदारांनी सभागृहातच धुलाई केली.

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना खासदारांनी धुतलं
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना खासदारांनी धुतलं
नवी दिल्ली, 13 डिसेंबर : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन व्यक्ती सभागृहात शिरल्या. प्रेक्षक गॅलरीतून या दोघांनी खासदार बसतात तिथे उडी मारली. हे दोघं सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितलं.
काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले. संसदेत पकडलेल्यांपैकी एकजण महाराष्ट्रातील लातूरचा असल्याचं समजतं. लातूरचा अमोल शिंदे आणि हिस्सारची नीलम सिंग अशी दोघांची नावं असल्याची माहिती आहे. तसंच संसदेच्या बाहेर दोघांकडून घोषणाबाजी करत स्मोक कँडल जाळण्यात आली.
या दोघांनी प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेत उडी मारली त्यानंतर खासदारांकडून यातल्या एकाला मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
advertisement
ज्या तरुणांनी गोंधळ घातला. त्यांना अटक करण्यात आली आहे. संसदेत आणि बाहेर जे घोषणाबाजी करत होते, त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सर्व साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यांची पोलीस चौकशी करत आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
advertisement
नेमकं काय घडलं?
संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज दुपारी कामकाज सुरू असताना अचानक एका तरुणाने जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात उडी मारली. हा तरुण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेला होता. सभागृहात उडी मारल्यानंतर घोषणाबाजी करत आणि खासदारांच्या टेबलावरून उड्या मारत हा तरुण पुढे जात होता. पण त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी या तरुणाला पकडलं. एकूण 3 जण होते. तिघांमध्ये दोन तरुण आणि एक महिला आहे. यात महाराष्ट्रातील अमोल शिंदे नावाच्या तरुणाचाही समावेश आहे. अमोल शिंदे लातूरचा असल्याची माहिती समोर येतेय. म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावे पास तयार केले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
Parliament Security Breach: लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदारांनी पकडलं, नंतर घडलं भयानक LIVE VIDEO
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement