आई रात्रभर कुणाशी बोलते? मुलांच्या डोक्यात संशयाचं भूत, काळोखात जन्मदातीसोबतच केलं घृणास्पद कृत्य
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आई रात्रभर कुणाशी बोलते? या संशयातून तिच्या दोन मुलांनी घृणास्पद कृत्य केलं आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे.
40 वर्षांच्या महिलेची तिच्याच दोन मुलांनी गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिलेचा एक मुलगा अल्पवयीन आहे. हत्या झाल्यानंतर काही तासांमध्येच पोलिसांनी महिलेच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे. चौकशीमध्ये दोन्ही मुलांनी हत्या केल्याचं कबूल केलं आहे. मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने एफआयआर दाखल केला. मागच्या वर्षभरापासून संपूर्ण कुटुंब शेतात काम करत होतं.
हत्येच्या रात्री, शेतमालकाने हत्या झालेल्या महिलेच्या वडिलांना सांगितलं की त्याच्या नातवाने आईची हत्या केली आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर वडिलांना त्यांची मुलगी मृतावस्थेत आढळली, तसंच तिच्या मानेवर गळा दाबून मारल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.
आईवर दोन्ही मुलांचा संशय
पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की महिलेचा मोठा मुलगा 19 वर्षांचा आहे, तर धाकटा मुलगा अल्पवयीन आहे. दोन्ही मुलं आईच्या वागण्यावर नाराज होती. आईचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दोन्ही मुलांना होता. आई रात्री उशिरा फोनवर बोलायची आणि घरातील कामांकडे दुर्लक्ष करायची. घटनेच्या रात्रीही मुलांनी आईला फोनवर बोलताना पाहिलं, त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात आईचा गळा दाबून तिची हत्या केली. ही महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. महिलेचा पती गुरेढोरे पाळण्याचं काम करतो. हत्या झाली तेव्हा तो कामासाठी बाहेर गेला होता.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचे 20 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण मागच्या महिन्यात ती महिला पतीपासून अंतर राखत होती, त्यामुळे मुलांचा संशय वाढला. हत्या केल्यानंतर दोन्ही मुलांनी रात्र शेतात घालवली आणि दोघंही सकाळपर्यंत तिथेच राहिले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 103 (1), 54 आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस महिलेच्या दोन्ही मुलांची कसून चौकशी करत आहेत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील नाना काडिया गावात या संपूर्ण घटनेमुळे खळबळ माजली आहे.
Location :
Kutchh,Gujarat
First Published :
September 15, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/देश/
आई रात्रभर कुणाशी बोलते? मुलांच्या डोक्यात संशयाचं भूत, काळोखात जन्मदातीसोबतच केलं घृणास्पद कृत्य