कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली; जाणून घ्या JN.1 किती धोकादायक?

Last Updated:

जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या वेळी कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट 'JN.1' हा चिंतेचं कारण ठरत आहे.

News18
News18
नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या वेळी कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट 'JN.1' हा चिंतेचं कारण ठरत आहे. हा सब-व्हेरियंट प्रथम युरोपातील लक्झेंबर्गमध्ये आढळला होता. तो भारतात पोहचला असून, केरळमध्ये JN.1चे रुग्ण सर्वात प्रथम आढळले. आता केरळसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या रविवारी (17 डिसेंबर) कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. भारत सरकारने कोरोनाबाबत खबरदारी घेण्यासाठी विविध राज्यांना सूचना जारी केल्या आहेत.
JN.1 किती धोकादायक
कोविड-19चा हा नवीन सब-व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीला हुलकावणी देण्यात पटाईत आहे. त्याची लक्षणं या पूर्वीच्या कोविड व्हेरियंट्ससारखीच आहेत. यामध्ये ताप येणं, सर्दी होणं, घसा खवखवणं, डोकेदुखी, पोटदुखी आणि जुलाब या लक्षणांचा समावेश आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, JN.1 या नवीन सब-व्हेरियंटमुळे गॅस्ट्रोइंटेस्टीनल समस्या अधिक होऊ शकतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी सांगितलं की, JN.1 हा इतर प्रकारांपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. जरी हा सब-व्हेरियंट आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला मात देण्यास सक्षम असला तरी त्याची लागण झाल्यानंतर स्थिती अधिक गंभीर होण्याची किंवा रुग्णालयात दाखल व्हावं लागण्याची शक्यता खूप कमी आहे.
advertisement
सावध राहण्याचे आवाहन
तज्ज्ञांनी, JN.1 व्हेरियंटबाबत सतर्क आणि सावध राहण्यास सांगितलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लसीकरणामुळे आपले शरीर विषाणूंच्या विविध व्हेरियंट्सशी लढण्यास सक्षम आहे. JN.1चा पहिला रुग्ण सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत आढळला होता. 15 डिसेंबर रोजी चीनमध्ये याचे सात रुग्ण आढळले. त्यामुळे याच्या प्रसाराची चिंता वाढली. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी चेतावणी दिली की, कोविड -19 आणि इन्फ्लुएंझाची नवीन प्रकरणे यूएसमधील आरोग्य सेवा प्रणालीवर परिणाम करू शकतात. सीडीसीच्या ट्रॅकिंगवरून असं निदर्शनास आलं आहे की, कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
advertisement
स्पाइक प्रोटीन करेल व्हायरसला मदत
भारतामध्ये, केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलममध्ये 78 वर्षीय वृद्ध महिलेला सर्वांत अगोदर JN.1ची लागण झाली. JN.1 हा सब-व्हेरियंट ओमिक्रॉनच्या 'पिरोला' या व्हेरियंटपासून म्युटेट झाला आहे. यात स्पाइक प्रोटीन आहे. हा घटक व्यक्तीच्या शरीरात विषाणूची तीव्रता वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्यास मदत करतो. स्पाइक प्रोटीन लोकांना संक्रमित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. या कारणास्तव लसीचे डोस स्पाइक प्रोटीनला देखील टारगेट करण्याच्या उद्देशाने दिले जात आहेत.
मराठी बातम्या/देश/
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली; जाणून घ्या JN.1 किती धोकादायक?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement