ना वीज, ना कोळसा, ना डिझेल तर हवेवर चालणार ट्रेन; तिकीट फक्त 5 रुपये; कुठे आणि कसा करता येईल प्रवास?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ही नवीन ट्रेन दिसायला जेवढी आकर्षक आहे, तेवढीच ती वेगाच्या बाबतीत 'वंदे भारत'ला टक्कर देणारी आहे. ताशी 150 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असलेली ही ट्रेन एकाच वेळी 2,600 प्रवाशांना घेऊन जाऊ शकते.
मुंबई : रेल्वेचा प्रवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते रेल्वेचे लांबच लांब रूळ आणि इंजिनमधून निघणारा धूर किंवा विजेच्या तारा. पण, आता भारतीय रेल्वे (Indian Railways) एक असा चमत्कार घडवण्याच्या तयारीत आहे, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. प्रदूषण नाही, आवाज नाही आणि खिशाला परवडणारे तिकीट. लवकरच भारतात एक अशी ट्रेन धावणार आहे, जी डिझेल किंवा विजेवर नाही तर चक्क 'हवेवर' (हायड्रोजनवर) चालणार आहे. 26 जानेवारी 2026 रोजी, म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ही ट्रेन रुळावर धावण्याची दाट शक्यता आहे.
ही नवीन हायड्रोजन ट्रेन दिसायला जेवढी आकर्षक आहे, तेवढीच ती वेगाच्या बाबतीत 'वंदे भारत'ला टक्कर देणारी आहे. ताशी 150 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असलेली ही ट्रेन एकाच वेळी 2,600 प्रवाशांना घेऊन जाऊ शकते. पण सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे तिचे तिकीट दर. सूत्रांच्या माहितीनुसार, या हायड्रोजन ट्रेनचे किमान भाडे फक्त 5 रुपये आणि कमाल भाडे 25 रुपये असू शकते. प्रीमियम सुखसोयी असूनही एवढे कमी भाडे हे सामान्य प्रवाशांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे.
advertisement
नेमकं काय आहे 'हायड्रोजन तंत्रज्ञान'?
ही ट्रेन ना डिझेलवर चालते ना विजेवर. याला 'ग्रीन ट्रेन' म्हटले जाते. यात पाण्यापासून हायड्रोजन वायू वेगळा केला जातो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर ट्रेन धावते. या प्रक्रियेत इंजिनमधून धूर नाही तर फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते. यामुळे पर्यावरणाचे अजिबात प्रदूषण होत नाही. 1 किलो हायड्रोजन गॅसमध्ये ही ट्रेन 2 किलोमीटरचे अंतर कापते.
advertisement
विमानासारखा अनुभव आणि मेट्रोसारखी सुविधा
चेन्नईच्या 'इंटिग्रल कोच फॅक्टरी' (ICF) मध्ये तयार झालेल्या या ट्रेनचा रंग निळा आणि पांढरा आहे. आतून पाहिल्यास तुम्हाला ती एखाद्या विमानासारखी वाटेल. तिला मेट्रोप्रमाणे स्वयंचलित दरवाजे. निळ्या रंगाचे आरामदायी गादीचे सीट, एलईडी लाईट पॅनेल आणि मॉडर्न पंखे आहेत. तापमानासाठी सेन्सर्स आणि अत्याधुनिक 'बायो टॉयलेट्स'ची सोय.
कुठे धावणार देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन?
भारतातील ही पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणामधील जिंद ते सोनिपत या सेक्शनमध्ये धावणार आहे. साधारण 356 किलोमीटरचा पल्ला ही ट्रेन गाठणार आहे आणि प्रवासात 4 ते 5 महत्त्वाचे थांबे असतील. सुरुवातीला हा प्रयोग या मार्गावर यशस्वी झाल्यानंतर देशातील इतर भागांतही अशा गाड्या सुरू केल्या जातील.
advertisement
भारतीय रेल्वेने टाकलेलं हे पाऊल केवळ प्रवासाचा वेग वाढवणारं नाही, तर निसर्गाचं रक्षण करणारंही आहे. 26 जानेवारीला रेल्वे मंत्रालयाकडून याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आता सर्वच भारतीयांना लागली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 8:29 PM IST
मराठी बातम्या/देश/
ना वीज, ना कोळसा, ना डिझेल तर हवेवर चालणार ट्रेन; तिकीट फक्त 5 रुपये; कुठे आणि कसा करता येईल प्रवास?









