Operation Sindoor: पाकिस्तानचे 5 फायटर विमानं पाडले, इंडियन एअरफोर्सकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची कणा असलेली ठिकाणं उद्ध्वस्त केली आणि पाच लढाऊ विमानं पाडली, अशी माहिती एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी दिली.
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचं कंबरडच मोडलं नाही तर कणा असलेली ठिकाणंही उद्ध्वस्त केली. इतकंच नाही तर पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं पाडल्याची माहिती भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी दिली.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राइकदरम्यान किती आणि काय-काय उद्ध्वस्त केलं याचा संपूर्ण सविस्तर लेखाजोखा त्यांनी मांडला. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं. त्यांनी याचे फोटो देखील जाहीर केले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबद्दल हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी मोठा खुलासा केला.
advertisement
बंगळुरू इथे झालेल्या एअर चीफ मार्शल एलएम कात्रे व्याख्यानात त्यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सरफेस-टू-एअर मिसाईल सिस्टमने पाकिस्तानचे 5 लढाऊ विमान आणि एक AWACS विमान पाडलं. ते म्हणाले की S-400 एअर डिफेन्स सिस्टमने ही पाकिस्तानी विमाने पाडली, ज्यामध्ये AEW&C/ELINT विमानांना 300 किलोमीटर अंतरावरून टार्गेट करण्यात आलं.
advertisement
भारताने देखील क्षेपणास्त्रांचा वापर केला. भारताच्या सर्व क्षेपणास्त्रांनी त्यांच्या लक्ष्यावर हल्ला केला, ज्यामध्ये रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या जनरल मुख्यालयाजवळील नूर खान एअरबेसला टार्गेट करण्यात आलं होतं. भारताने सलग दुसऱ्या दिवशी स्ट्राइक करुन पाकिस्तानचे दहशतवादी तळ नेस्तनाभूत केले होते.
90 मिनिटांच्या आत, भारताने नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफीकी एअरबेस, पंजाबमधील मुरीद एअरबेस, सिंधमधील सुक्कुर एअरबेस, सियालकोट एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कार्दू एअरबेस, कराचीजवळील भोलारी एअरबेस, जेकबाबाद एअरबेस आणि पसरूर एअरस्ट्रिपवर हल्ला केला होता.
advertisement
पाकिस्तानने जेव्हा भारतावर मिसाइल सोडण्याचे धाडस केलं तेव्हा त्याच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताने त्याला चोख प्रत्युत्तर म्हणून दुसरा एअर स्ट्राइक केला. या प्रत्युत्तरात चुनियान रडार इन्स्टॉलेशनवर हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलं. भारताने या मोक्याच्या हवाई तळांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि राफेल लढाऊ विमानांमधून हॅमर आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला त्यांच्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक असल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण टाइमलाईन
1:28 AM: इंडियन आर्मीच्या अधिकृत हँडल ADGPI ने ट्विट केले: प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः। (प्रहारासाठी तत्पर, विजयासाठी प्रशिक्षित.) हे ऑपरेशनच्या सुरुवातीचे संकेत होते.
1:28 AM ते 1:51 AM दरम्यान: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्फोट झाले. विशेषतः मुजफ्फराबादसारख्या भागातील स्थानिक लोकांनी ग्रीड स्टेशन्सवर क्षेपणास्त्र हल्ल्यांविषयी सांगितले. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण होते.
advertisement
1:51 AM: सैन्याने दुसरे ट्विट केले
पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला आहे. याच ठिकाणांहून भारतातील दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली गेली होती. भारतीय सशस्त्र दलाकडून एकूण 9 ठिकाणे लक्ष्य करण्यात आली आहेत.
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. पण भारतानं नेमकी हीच तळ का उद्धवस्त केली?
advertisement
बहावरपूर - या ठिकाणी जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आहे. भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो.
मुरीदके - सांबातील सीमारेषेपासून 30 किलोमीटर अंतरावर लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी तळ आहे. 2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी इथूनच आले होते.
गुलपूर - नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरीपासून 35 किलोमीटरवर हा दहशतवाद्यांचा तळ आहे. 20 एप्रिल 2023 आणि 24 जून 2024 मध्ये भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा प्लान इथूनच ठरवण्यात आला होता.
सवाई - पीओकेमध्ये तंगधार सेक्टरपासून 30 किलोमीटर अंतरावर हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी तळ आहे. 21 ऑक्टोबर 2024मध्ये गांदरबाल, 24 ऑक्टोबर 2024मध्ये गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचा कट इथंच रचला होता.
बिलाल - हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठवण्याचा लाँच पॅड आहे.
कोटली - राजौरी इथल्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर हा लष्कर-ए-तोयबाचा लष्करी तळ आहे. इथं जवळपास 50 दहशतवादी होते.
बरनाला - राजौरी जवळ 10 किलोमीटर अंतरावर हा दहशतवाद्यांचा तळ होता.
सरजाल - सांबा-कठुआ सीमेजवळ नियंत्रण रेषेपासून 8 किलोमीटर अंतरावर हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ होता.
महमूना - सियालकोटजवळ नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर दूरवर हा हिजबुल्ला दहशतवादी संघटनेचा तळ होता.
view commentsLocation :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
August 09, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/देश/
Operation Sindoor: पाकिस्तानचे 5 फायटर विमानं पाडले, इंडियन एअरफोर्सकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा


