BSF Jawan : पाकिस्तानने केली BSF जवानाची सुटका, भारताच्या कारवाईचा घेतला धसका
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ind vs Pak : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अक्षरशः हादरला आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या या शेजारी देशाने, भारताच्या कठोर आणि निर्णायक पावलांनंतर नरमाईचा आव आणायला सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली: भारतीय सीमेवर कुरापतीखोर कारवाया करणारा पाकिस्तान, भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अक्षरशः हादरला आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या या शेजारी देशाने, भारताच्या कठोर आणि निर्णायक पावलांनंतर नरमाईचा आव आणायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानात चुकून नियंत्रण रेषा ओलांडून गेलेल्या BSF जवान पी.के. साहू याला पाकिस्तानने तात्काळ परत पाठवलं. आज सकाळी अट्टारी सीमेवरून बीएसएफचे जवान पी.के. साहू हे भारतात दाखल झाले.
भारताने अलीकडेच पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रभावी कारवाई केली. या कारवाईमुळे पाकिस्तानला स्वतःच्या सीमेलाच सांभाळणं कठीण झालं आहे. भारताच्या लष्करी क्षमतेची झलक पाहून पाकिस्तानची भीती उघडपणे दिसून येत आहे. भारताचे भयंकर रूप पाहून पाकिस्तान घाबरला आणि त्याने शस्त्रसंधीची विनंती करण्यास सुरुवात केली. शस्त्रसंधीनंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानने भारतीय सीमा सुरक्षा दलाचा जवान पी.के. साहू यांची सुटका केली आहे.
advertisement
सविस्तर बातमी थोड्याच वेळेत...
Location :
New Delhi,Delhi
First Published :
May 14, 2025 11:57 AM IST