PM मोदींनी घेतली खासदारकीची शपथ, अधिवेशनाआधी विरोधकांना सल्ला, आणीबाणीचाही उल्लेख
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातलं संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदींसह इतर नवनिर्वाचित खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली.
दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातलं संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदींसह इतर नवनिर्वाचित खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली. संसदेत अधिवेशनाला उपस्थित राहण्याआधी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. आजचा दिवस संसदीय लोकशाहीचा अभिमानाचा दिवस आहे, गौरवाचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नवीन संसदेत ही शपथ घेतली जात आहे, आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसदेत होत होती असं मोदींनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीचा उल्लेखही यावेळी केला. उद्या 25 जून, 50 वर्षांपूर्वी या दिवशी संविधानाला काळे फासण्यात आले. अशी काजळी देशात कधीही येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू असं नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील जनतेला नाटक आणि कोलाहल नको आहे. देशाला घोषणांची नाही तर पदार्थाची गरज आहे. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची, जबाबदार विरोधी पक्षाची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
advertisement
पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देशसेवेची संधी मिळाली आहे, ही संधी 60 वर्षांनंतर आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. आमचा विश्वास आहे की सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे पण देश चालवण्यासाठी संमती खूप महत्त्वाची आहे. देशातील जनतेने आपल्याला तिसऱ्यांदा संधी दिली आहे. आमच्या जबाबदाऱ्या तीन पटींनी वाढल्या आहेत . म्हणूनच मी देशवासियांना आश्वासन देतो की आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही तिप्पट मेहनत करू आणि तिप्पट परिणाम साध्य करू.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2024 11:36 AM IST