PM Modi Parliament Speech : पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू होताच काँग्रेसचा गोंधळ, लोकसभा अध्यक्ष राहुल गांधींवर भडकले

Last Updated:

लोकसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतल्या पहिल्या भाषणाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले.

पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू होताच काँग्रेसचा गोंधळ, लोकसभा अध्यक्ष राहुल गांधींवर भडकले
पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू होताच काँग्रेसचा गोंधळ, लोकसभा अध्यक्ष राहुल गांधींवर भडकले
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतल्या पहिल्या भाषणाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले. पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू होताच काँग्रेस खासदारांसह विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला सुरूवात केला, त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राहुल गांधींवर भडकले. हे संसदेच्या आणि विरोधी पक्षाच्या पदाला शोभा देणारं नाही, असं ओम बिर्ला राहुल गांधींना म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी सुरुवातीपासूनच विरोधकांनी गोंधळ घातला, मोदींच्या भाषणात अडथळा आणल्याने शेवटी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांना आणि विरोधकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान बोलत असताना विरोधी पक्षनेत्यांनी खासदारांना उभा राहून गोंधळ घालण्याचे आदेश देणं हे चुकीचं आहे. लोकांना वेलमध्ये येण्याचा इशारे करताय हे चुकीची पद्धत आहे, अशा शब्दात लोकसबा अध्यक्षांनी राहुल गांधींना सुनावलं.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विकसीत भारताच्या संकल्पाला आपल्या अभिभाषणात विस्ताराने सांगितलं. महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत. आम्हा सर्वांचे आणि देशाचे मार्गदर्शन केलं. यासाठी मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मनापासून आभार मानतो.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अनेकांनी विचार मांडले. विशेषत: पहिल्यांदा खासदार होऊन आलेल्या काही सहकाऱ्यांनी जे विचार मांडले. संसदेच्या सर्व नियमांचे पालन करत विचार मांडले. त्यांचं वर्तन एका अनुभवी खासदारासारखं होतं. त्यामुळे पहिल्यांदा इथं येऊनही त्यांनी संसदेची प्रतिष्ठा वाढवली आणि आपल्या विचारांनी या चर्चेला आणखी मौल्यवान बनवलं.
advertisement
देशाने एका यशस्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यातून जगाला दाखवून दिलं की ही जगातली सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. देशाच्या जनतेने जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेत आम्हाला जनतेने निवडून दिलं आणि मी काही लोकांचा त्रास समजू शकतो. जे सातत्याने खोटं बोलूनही त्यांचा मोठा पराभव झाला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला.
view comments
मराठी बातम्या/देश/
PM Modi Parliament Speech : पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू होताच काँग्रेसचा गोंधळ, लोकसभा अध्यक्ष राहुल गांधींवर भडकले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement