ट्रम्प-पुतिन भेटीपूर्वी दिल्लीत मोठी घडामोड, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींना फोन; झेलेन्स्कींचा थरारक खुलासा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Narendra Modi And Volodymyr Zelenskyy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत शांततापूर्ण निराकरणासाठी भारताची ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट केली. संवादादरम्यान झेलेन्स्की यांनी रशियन हल्ल्यांच्या ताज्या घटनांची माहिती दिली आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादात मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताची ठाम आणि सातत्यपूर्ण भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. शांतता लवकर प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.
एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले की- राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धाशी संबंधित अलीकडील घडामोडींवर आपले विचार मांडले. या संदर्भात शक्य ते सर्व सहकार्य देण्याची भारताची कटिबद्धता मोदींनी पुन्हा व्यक्त केली.
दोन्ही नेत्यांनी भारत-युक्रेन द्विपक्षीय भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बोलून आनंद झाला आणि अलीकडील घडामोडींवर त्यांचे विचार ऐकले. संघर्षाच्या लवकर आणि शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेबाबत भारताची सातत्यपूर्ण भूमिका मी पुन्हा सांगितली. या संदर्भात शक्य ते सर्व योगदान देण्यास आणि युक्रेनसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यास भारत कटिबद्ध आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
advertisement
Glad to speak with President Zelenskyy and hear his perspectives on recent developments. I conveyed India’s consistent position on the need for an early and peaceful resolution of the conflict. India remains committed to making every possible contribution in this regard, as well…
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2025
advertisement
संवादादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना युक्रेनियन शहरे आणि गावांवर रशियन हल्ल्यांची माहिती दिली. त्यांनी काल झापोरिझ्झियामधील बस स्थानकावरील हल्ल्याचाही उल्लेख केला. जिथे रशियन सैन्याने जाणूनबुजून केलेल्या बॉम्ब हल्ल्यात डझनभर लोक जखमी झाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/देश/
ट्रम्प-पुतिन भेटीपूर्वी दिल्लीत मोठी घडामोड, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींना फोन; झेलेन्स्कींचा थरारक खुलासा


