Priyanka Gandhi : 4400 ग्रॅम सोनं, शिमल्यात कोट्यवधींचं घर, प्रियांका गांधींची संपत्ती किती?
- Published by:Suraj
Last Updated:
Priyanka Gnadhi : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना प्रियांका गांधी यांनी त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रीय असल्या तरी त्या पडद्यामागून पक्षाचं काम करत होत्या. आता लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी रायबरेलीतून खासदार राहणं पसंद केलं. त्यामुळे वायनाड मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या जागी प्रियांका गांधी निवडणूक लढत आहेत. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना प्रियांका गांधी यांनी त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला आहे.
प्रियांका गांधी यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण उत्पन्न ४६.३९ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगितलंय. यात भाडं, बँक आणि इतर गुंतवणूक यातून मिळणाऱ्या व्याजाचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांनी ४.२४ कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं सांगितलंय. यात तीन बँकांमध्ये वेगवेगळी रक्कम जमा आहे. याशिवाय म्युच्युअल फंड, पीपीएफमध्ये गुंतवणूक, पती रॉबर्ड वाड्रा यांनी गिफ्ट दिलेली होंडा सीआरवी कार आणि सव्वा कोटी रुपयांचे ४४०० ग्रॅम सोने याचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.
advertisement
स्थावर मालमत्तेत प्रियांका गांधी यांच्याकडे दिल्लीतील महरौली परिसरात वारसा हक्काने मिळालेली जमीन आहे. तिथं एका फार्महाऊसमधील अर्धा भागही आहे. याची एकूण किंमत २.१० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रियांका गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील शिमला इथं त्यांच्याकडे एक घर आहे. त्याची सध्याची किंमत ५.६३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात पतीच्या संपत्तीची माहितीसुद्धा दिलीय. त्यानुसार पती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे ३७.९ कोटी रुपयांपेक्षा अधिक जंगम मालमत्ता तर २७.६४ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
advertisement
प्रियांका गांधी १५.७५ लाख रुपये देणे आहेत. २०१२-१३मधील आयकर पूनर्मूल्यांकन कारवाई प्रकरण आहे. त्याचे १५ लाख रुपये त्यांना भरायचे आहेत. त्यांच्यावर दोन एफआयआर असून वन विभागाने नोटीसही पाठवली आहे. संभ्रम पसरवणाऱ्या पोस्ट केल्याचा आरोप त्यांचावर होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2024 12:02 PM IST
मराठी बातम्या/देश/
Priyanka Gandhi : 4400 ग्रॅम सोनं, शिमल्यात कोट्यवधींचं घर, प्रियांका गांधींची संपत्ती किती?