धक्कादायक! कुत्रा चावल्यानंतर रेबीजचे 3 इंजेक्शन घेतले, 15 दिवसात व्यक्तीचा मृत्यू

Last Updated:

बालाघाटमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जमीर खान जखमी झाले. तीन रेबीज इंजेक्शन घेतल्यानंतरही त्यांचा नागपूरमध्ये मृत्यू झाला. इंजेक्शनच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण.

News18
News18
भटक्या कुत्र्‍यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. हे कुत्रे अचानक हल्ला करतात. नमाज पठण करण्यासाठी जात असताना एका व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्‍याच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी झाला. मध्यप्रदेशातील बालाघाट शहरात सध्या मोकाट कुत्र्‍यांची दहशत नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. १५ दिवसांपूर्वी एका मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. वार्ड क्रमांक ९ मधील रहिवासी असलेले जमीर खान हे वाहनांमध्ये वायरिंगचे काम करायचे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेऊनही त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नमाजला जाताना झाला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी जमीर खान हे सकाळी ५ वाजता नमाज पठणासाठी जामा मशिदीकडे पायी जात होते. याचवेळी पोलीस कॉलनीजवळ त्यांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याने जमीर खान यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन त्यांना रक्तबंबाळ केले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेऊन रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनचा पहिला डोस देण्यात आला. घटनेपर्यंत जमीर खान यांना रेबीजचे तीन इंजेक्शन देण्यात आले होते, तर चौथा इंजेक्शन २० डिसेंबरला देणे अपेक्षित होते.
advertisement
डॉक्टरही हैराण, नागपूरमध्ये अखेरचा श्वास
जमीर खान यांना तीन इंजेक्शन लागूनही त्यांची प्रकृती बिघडायला लागली. २ डिसेंबरपासून त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने त्यांना तातडीने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेबीजचे इंजेक्शन देऊनही रुग्णाची तब्येत का बिघडली? या प्रश्नाने डॉक्टरही गोंधळात पडले. अखेर प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. तिथे शनिवारी रात्री त्यांना दाखल करण्यात आले, दुर्दैवाने त्याच रात्री त्यांचा निधन झाले.
advertisement
इंजेक्शनच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
जमीर खान यांना रेबीजचे तीन डोस मिळाले असतानाही त्यांचा मृत्यू झाल्याने, जिल्हा रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची गुणवत्ता प्रभावी आहे की नाही, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याबद्दल जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉ. निलय जैन यांनी सांगितले की, "मृताच्या डायग्नोसिस रिपोर्टमध्ये नेमके मृत्यूचे कारण काय दिले आहे, हे नागपूरच्या डॉक्टरांकडून जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तीन इंजेक्शननंतर संसर्गाचा धोका कमी होतो. अनेक रुग्णांना या इंजेक्शनमुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जमीर खान यांचा मृत्यू खरोखरच रेबीजच्या संसर्गाने झाला की अन्य कारणांमुळे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे."
view comments
मराठी बातम्या/देश/
धक्कादायक! कुत्रा चावल्यानंतर रेबीजचे 3 इंजेक्शन घेतले, 15 दिवसात व्यक्तीचा मृत्यू
Next Article
advertisement
Tukaram Mundhe: भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात मागणीचं कारण काय?”
BJP आमदारांच्या रडारवर मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात काय होणार?
  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

View All
advertisement