राहुल गांधी यांना Z+ ASL सुरक्षा, परदेश दौऱ्याआधी सांगणं आवश्यक पण... गंभीर आरोप करणारं पत्र

Last Updated:

Rahul Gandhi: झेड प्लस एएसएल सुरक्षेने सुसज्ज असलेल्या व्हीआयपींना परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी १५ दिवस आधी त्यांच्या सुरक्षा एजन्सीला माहिती देणे बंधनकारक असल्याचे सीआरपीएफ राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत गंभीर मुद्दा समोर आला आहे. सुरक्षेसबंधीची नियमावली अर्थात प्रोटोकॉल राहुल गांधी हे गांभीर्याने घेत नसून ते कोणतेही नियम पाळत नाहीत, अशी तक्रार करणारे पत्र सीआरपीएफने लिहिले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सीआरपीएफचे डीजी सिक्युरिटी यांनी १० सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. या पत्रात CRPF व्हीव्हीआयपी सिक्युरिटीचे प्रमुख सुनील जून यांनी राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत नसल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींकडे Z+ with ASL सुरक्षा श्रेणी असून ते नियमांचे उल्लंघन करत असल्याचे नमूद केले आहे. राहुल गांधी हे 'यलो बुक प्रोटोकॉल' न पाळता विदेश दौऱ्यावर गेल्याची तक्रार पत्रात करण्यात आली आहे.
advertisement
मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना तक्रार पत्र लिहून भविष्यात सुरक्षा प्रोटोकॉलची काळजी घेण्याचे आवाहन सीआरपीएफने केले आहे. पत्रात म्हटले आहे की, झेड प्लस एएसएल सुरक्षेने सुसज्ज असलेल्या व्हीआयपींना परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी १५ दिवस आधी त्यांच्या सुरक्षा एजन्सीला माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जाताना अजिबात सुरक्षा यंत्रणेला कळवत नाही, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.
advertisement
राहुल गांधी हे देशातील त्या मोजक्या व्हीव्हीआयपींपैकी एक आहेत जे अत्यंत संवेदनशील आहेत परंतु ते त्याचे प्रोटोकॉल पाळत नाहीत. सीआरपीएफच्या मते, राहुल गांधी गेल्या ९ महिन्यांत ६ वेळा सुरक्षा भंग करून परदेश दौऱ्यावर गेले आहेत. परंतु हे ६ परदेश दौरे सुरक्षा एजन्सीला न कळवता करण्यात आले ज्यामुळे सुरक्षा एजन्सीला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.
advertisement
दरम्यान, गेल्या ९ महिन्यांत राहुल यांनी ६ परदेशी दौऱ्यांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांचे परदेश दौरे

३० डिसेंबर २०२४ ते ९ जानेवारी दरम्यान इटलीचा पहिला दौरा.
नवीन वर्षात १०/११ दिवसांचा परदेश दौरा
१२ मार्च ते १७ मार्च दरम्यान व्हिएतनामचा दुसरा दौरा
advertisement
१७ ते २३ एप्रिल दरम्यान दुबईचा तिसरा दौरा
११ ते १८ जून दरम्यान दोहा, कतारचा चौथा दौरा
२५ जून ते ६ जुलै दरम्यान लंडनचा पाचवा दौरा
४ ते ८ सप्टेंबर दरम्यान मलेशियाचा सहावा दौरा
view comments
मराठी बातम्या/देश/
राहुल गांधी यांना Z+ ASL सुरक्षा, परदेश दौऱ्याआधी सांगणं आवश्यक पण... गंभीर आरोप करणारं पत्र
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement