'14 मिनिटांत 12 मतदार डिलीट', राहुल गांधींनी मतचोरीचं पितळ उघडं पाडलं, सगळा झोल सांगितला

Last Updated:

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये कशाप्रकारे फेरफार होत आहे. हे पुरावे दाखवत सांगितलं आहे. त्यांनी मतचोरीच्या काही पद्धती देखील सांगितल्या.

News18
News18
काँग्रेस खासदार राहुल गांधी मागील काही दिवसांपासून सातत्याने मतचोरीचा आरोप करत आहे. या आधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरी कशाप्रकारे होते, हे सप्रमाण दाखवलं होतं. तसेच आपण थोड्याच दिवसात मतचोरीबाबत हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये कशाप्रकारे फेरफार होत आहे. हे पुरावे दाखवत सांगितलं आहे. त्यांनी मतचोरीच्या काही पद्धती देखील सांगितल्या. आपण विरोधी पक्षनेता आहे, त्यामुळे आपण पुराव्याशिवाय कोणताही दावा करत नाही असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसच्या समर्थनार्थ असलेले मतदार जाणीवपूर्वक पद्धतीने मतदार यादीतून वगळले आहेत. दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मतांना जाणीवपूर्वक वगळलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी सूर्यकांत नावाच्या एका व्यक्तीच्या नंबरवरून १४ मिनिटांत १२ डिलिटेशन फॉर्म भरण्यात आले होते, असा दावा केला आहे. तसेच हे सगळं व्यक्तिगत करण्यात आलं नाही, तर असं करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला, असंही राहुल गांधी म्हणाले.
advertisement
सूर्यकांत, नावाच्या व्यक्तीने अवघ्या १४ मिनिटांत १२ वोटर डिलीट केले. त्यांनी अवघ्या १४ मिनिटांत मतदार यादीतून नावं काढून घेण्यासाठी १२ डिलिटेशन अर्ज दाखल केले. यासाठी वेगवेगळ्या राज्यातील क्रमांक वापरून हे डिलिट करण्याचे अर्ज भरण्यात आले, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी यावेळी ज्यांच्या नावाने हे अर्ज डिलिट करण्यात आले आणि ज्याचे डिलिट केले गेले, अशा दोन्ही मतदारांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांना बोलायला लावलं. यावेळी त्यांनी आपण अशाप्रकारे कुणाचेही अर्ज बाद करण्यासंदर्भात अर्ज केला नव्हता. कुणीतरी अज्ञाताने आपल्या नंबरचा वापर करून अशाप्रकारे अर्ज डिलिशनचे अर्ज भरण्यात आले, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान, राहुल गांधींनी आणखी एक उदाहरण यावेळी सांगितलं. त्यात एका व्यक्तीच्या नावाने मतदाराचं नाव वगळण्यासाठी दोन अर्ज अवघ्या ३६ सेकंदांच्या अंतराने भरण्यात आले. विशेष म्हणजे हे अर्ज पहाटे ४ वाजता भरण्यात आल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. “नागराज नावाच्या व्यक्तीच्या नावाने दोन अर्ज फक्त ३६ सेकंदांमध्ये भरले गेले. हे फॉर्म भरून बघा किती वेळ लागतो. तुम्हाला स्वत:लाच याचं उत्तर कळेल. शिवाय या व्यक्तीने पहाटे ४ वाजता उठून हे अर्ज भरले आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.
मराठी बातम्या/देश/
'14 मिनिटांत 12 मतदार डिलीट', राहुल गांधींनी मतचोरीचं पितळ उघडं पाडलं, सगळा झोल सांगितला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement