मामा राहुलसोबत प्रियांकाच्या मुलाचा दिवाळी VIDEO, हे रेहान वाड्राचं सॉफ्ट लाँचिंग तर नाही?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
या निवडणुकीदरम्यान प्रियांका वाड्रा आपल्या मुलाला राजकारणात आणणार का अशी एक चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे वेगानं वाहात आहेत. प्रचारसभांची रणधुमाळी उडाली आहे. तर दुसरीकडे प्रियांका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीदरम्यान प्रियांका वाड्रा आपल्या मुलाला राजकारणात आणणार का अशी एक चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका गांधी यांचा मुलगा आणि राहुल गांधींचा भाचा रेहान वाड्रा दिसत आहे. राहुल गांधी त्याला नकळत राजकारणाचे धडे देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी 10 जनपथ निवासस्थानी पेंटिंग कामगारांशी बोलतांना आणि त्यांच्यासोबत रंगकाम करत करताना दिसले.
advertisement
एक दिवाली उनके साथ, जिनकी मेहनत से रौशन है भारत! pic.twitter.com/bfmmrjZD2S
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 1, 2024
राहुल गांधी हे करत असताना त्याचं महत्त्व रेहानला समजावून सांगत होते. ज्यांच्या हातांनी संपूर्ण भारत उजळला त्यांच्यासोबत एक दिवाळी साजरी करुया असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लवकरच प्रियांका वाड्रा आपल्या मुलाला रेहानला राजकारणात लवकरच आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
काँग्रेस समर्थक आणि कार्यकर्ते आणि विरोधक या व्हिडीओकडे रेहानचं राजकारणातलं सॉफ्ट लाँचिंग असल्यासारखं पाहात आहेत. प्रियांका वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवत असताना रेहानचं हे सॉफ्ट लाँचिंग एक चर्चेचा विषय ठरला आहे. रेहान वाड्रा सध्या 24 वर्षांचा आहे. तो एक व्हिज्युअल आर्टिस्ट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2024 9:00 AM IST
मराठी बातम्या/देश/
मामा राहुलसोबत प्रियांकाच्या मुलाचा दिवाळी VIDEO, हे रेहान वाड्राचं सॉफ्ट लाँचिंग तर नाही?