Indore Couple Missing: शरीरसंबंधासाठी सोनमने ठेवली होती एक अट, ज्यामुळे राजा रघुवंशी अडकला जाळ्यात, हत्याकांडात नवा ट्विस्ट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Indore Couple Missing Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. लग्नानंतर शरीरसंबंध ठेवण्यासाठी सोनमने पती राजा रघुवंशी याच्यासमोर एक अट ठेवली होती, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
Raja Raghuwanshi Murder Case: मध्य प्रदेशतील इंदूर येथील रहिवासी असणाऱ्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना बुधवारी शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर सोनम रघुवंशी आणि इतर चार आरोपींना शिलाँग सदर पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं. पाचही जणांच्या केलेल्या चौकशीतून आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. लग्नानंतर शरीरसंबंध ठेवण्यासाठी सोनमने पती राजा रघुवंशी याच्यासमोर एक अट ठेवली होती. ज्यामुळे राजा सोनमच्या जाळ्यात अडकला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शरीरसंबंध ठेवण्यासाठी सोनमने राजासमोर काय अट ठेवली
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोनमने लग्नानंतर शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पती राजा रघुवंशी याच्यासमोर एक अट ठेवली होती. शरीरसंबंध ठेवायचे असतील तर त्याआधी आसाममधील गुवाहाटीला जावं लागेल. तेथील कामाख्या देवीला नैवेद्य अर्पण करावा लागेल. हा विधी पार पाडल्यानंतरच शरीरसंबंध ठेवता येतील, अशी अट सोनमने राजाला घातली होती. यामुळेच राजा गुवाहाटीला जाण्यास तयार झाला आणि तो सोनमच्या जाळ्यात अडकला अशी धक्कादायक माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
advertisement
ज्यावेळी राजाच्या हत्येचा कट रचला होता. त्यावेळी सोनमचा प्रियकर राज कुशवाह याने तिन्ही मारेकऱ्यांना सर्वप्रथम रेल्वेने गुवाहाटीला पाठवलं होतं. कदाचित इथंच राजाची हत्या करण्याचा प्लॅन असावा. पण काही कारणामुळे हा प्लॅन फसला. त्यानंतर आरोपींनी शिलाँगमध्ये राजा रघुवंशीची हत्या केली.
सोनम आणि इतर चार आरोपी वेगवेगळ्या कोठडीत बंद
सोनमचे कथित प्रेमी राज कुशवाह आणि आकाश राजपूत यांना सदर पोलीस ठाण्याच्या एका कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर विशाल सिंग चौहान आणि आनंद सिंग कुर्मी यांना दुसऱ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सोनमला जेवण दिले होते. तिने जेवणही केलं होतं. न्यायालयात हजर होण्यापूर्वी आणि नंतर ती खूपच शांत दिसत होती. आरोपींच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सदर पोलीस ठाण्यात आणि सर्व कोठडीत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
advertisement
आरोपीच्या हालचालींबद्दल पोलिसांनी कोणती सांगितलं
घटनेनंतर आरोपींचे ठिकाण आणि हालचालींचाही पोलीस तपास करत आहेत. हत्येनंतर आरोपी शिलाँगहून गुवाहाटी, नंतर इंदूर आणि शेवटी गाजीपूरला गेला. या संदर्भात, जेव्हा अतिरिक्त एसपींना विचारण्यात आलं, तेव्हा पोलिसांनी हा एक विशेष हालचालींचा पॅटर्न आहे. याबाबत अजून तपास होणं बाकी आहे. हा तपास जसजसा पुढे जाईल तसतसा आपल्याला याबाबत अधिक माहिती मिळेल. ही हालचाल नियोजित होती की फक्त पळून जाण्याचा प्रयत्न होता, हेही समजू शकेल, असंही पोलिसांनी सांगितलं.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 12, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/देश/
Indore Couple Missing: शरीरसंबंधासाठी सोनमने ठेवली होती एक अट, ज्यामुळे राजा रघुवंशी अडकला जाळ्यात, हत्याकांडात नवा ट्विस्ट