VIDEO : जगासमोर पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! मोदी आणि पुतिन निघून गेले अन् टकामका बघत राहिले शहबाज शरीफ

Last Updated:

Pakistan PM Watching Modi Video : सोमवारी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन एकमेकांशी बोलत पुढे जात होते. तेव्हा शाहबाज शरीफ हात बांधून एका कोपऱ्यात उभे राहिलेले दिसले.

Pakistan PM Watching Modi Video
Pakistan PM Watching Modi Video
SCO Summit Viral Video : अमेरिकेशी पंगा घेतल्यानंतर आता चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर संमेलनात सहभाग घेतला. या संमेलनात त्यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भेट झाली. पंतप्रधान मोदी, पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, यावेळी पाकिस्तानची बेज्जती झाल्याचं पहायला मिळालं.

रंजक घटना घडली

यावेळी एक रंजक घटना समोर आली. पाकिस्तान देखील SCO चा सदस्य असल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ या संमेलनासाठी उपस्थित होते. या भेटीदरम्यान असं काही घडलं, ज्याची त्यांनाही अपेक्षा नव्हती.

पाहा Video

advertisement

आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तान एकाकी

सोमवारी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन एकमेकांशी बोलत पुढे जात होते. तेव्हा शाहबाज शरीफ हात बांधून एका कोपऱ्यात उभे राहिलेले दिसले. विशेष म्हणजे, त्यांच्याशी कोणीही बोलत नव्हतं आणि त्यांच्या जवळ कोणी उभंही नव्हतं.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान मोदी आणि पुतिन पुढे जात असताना पाकिस्तानचे पंतप्रधान केवळ त्यांच्याकडे पाहत राहिले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान जागतिक मंचावर एकाकी पडल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससीओच्या माध्यमातून पाकिस्तानला एक कडक संदेश दिला आहे. शाहबाज शरीफ यांना दुर्लक्ष करून, पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले आहे की दहशतवाद आणि संवाद कधीही एकत्र चालणार नाहीत.
मराठी बातम्या/देश/
VIDEO : जगासमोर पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! मोदी आणि पुतिन निघून गेले अन् टकामका बघत राहिले शहबाज शरीफ
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement