advertisement

'ए सिगरेट अन् दारू आण...' कॉलेजमध्ये रॅगिंगचा थरार; ज्युनियर्सवर लोखंडी सळ्या-दगडाने हल्ला

Last Updated:

पुस्तकांऐवजी त्यांच्या नशिबी लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडके आणि रॅगिंग आलं. सीनियर विद्यार्थ्यांकडून सतत अपमान, त्रास आणि मारहाण होऊ लागली.

News18
News18
आपल्या लेकाने शिकून खूप मोठं व्हावं, या स्वप्नासाठी अनेक आई-वडील पोटाला चिमटा काढून लाखो रुपयांची फी भरतात. एका नामांकित कॉलेजमध्येही असेच अनेक तरुण नवीन स्वप्न आले होते. मात्र त्यांना काय माहिती इथे किती भयंकर परिस्थिती आहे. पुस्तकांऐवजी त्यांच्या नशिबी लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडके आणि रॅगिंग आलं. सीनियर विद्यार्थ्यांकडून सतत अपमान, त्रास आणि मारहाण होऊ लागली.
नेमकी घटना काय आणि कशी सुरू झाली?
रॅगिंगचा हा अमानुष प्रकार १४ जानेवारी रोजी बेंगळुरू येथील आकाश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये सुरू झाला. सीनियर्सनी प्रथम वर्षाच्या ज्युनियर विद्यार्थ्यांना गाठलं आणि त्यांना सिगरेट, दारू आणण्याच्या ऑर्ड्स सोडल्या. हे सगळं इथेच थांबलं नाही, तर ज्युनियर्सना स्वतःची पुस्तके वाहून नेण्यासही भाग पाडले गेले. जेव्हा विद्यार्थ्यांनी याला विरोध केला, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली.
advertisement
कुठे घडली ही घटना?
कॉलेज प्रशासनाने या प्रकाराची दखल घेत सुरुवातीला औपचारिक ताकीद दिली होती. मात्र, १५ जानेवारी रोजी हा वाद विकोपाला गेला. दोन ज्युनियर विद्यार्थ्यांनी सीनियर्सच्या मागण्या धुडकावून लावल्याचा राग मनात धरून, आरोपी विद्यार्थ्यांनी त्यांना लोखंडी सळ्या, दगड आणि लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात आरोपींनी एका विद्यार्थ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळीही हिसकावून नेली. जेव्हा कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. ही धक्कादायक घटना कर्नाटकची राजधानी बेंगळुरूजवळील देवनहल्ली येथील आकाश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या खाजगी कॉलेज कॅम्पसमध्ये घडली आहे.
advertisement
या गंभीर प्रकरणाची दखल घेत कॉलेज प्रशासनाने १६ जानेवारी रोजी अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त २९ विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, तर २० हून अधिक जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका अशा व्यक्तीचाही समावेश आहे जो कॉलेजचा विद्यार्थी नाही, मात्र हल्ल्यात सहभागी होता.
advertisement
आरोपींवर आयपीसी आणि कर्नाटक शिक्षण कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित विद्यार्थी अज्ञान असल्याने पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
'ए सिगरेट अन् दारू आण...' कॉलेजमध्ये रॅगिंगचा थरार; ज्युनियर्सवर लोखंडी सळ्या-दगडाने हल्ला
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement