'मला मुलगी बनायचंय...', UPSC च्या विद्यार्थ्याचं घरात थरकाप उडवणारं कृत्य, स्वतःच्या हाताने केलं Private Part चं 'ऑपरेशन'

Last Updated:

युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने स्वत:च्या गुप्तांगावर घरातच ऑपरेशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑपरेशननंतर तरुण स्वतःच्या खोलीमध्ये विव्हळत होता, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना याबद्दल माहिती मिळाली.

'मला मुलगी बनायचंय...', UPSC च्या विद्यार्थ्याचं घरात थरकाप उडवणारं कृत्य, स्वतःच्या हाताने केलं Private Part चं 'ऑपरेशन' (AI Image)
'मला मुलगी बनायचंय...', UPSC च्या विद्यार्थ्याचं घरात थरकाप उडवणारं कृत्य, स्वतःच्या हाताने केलं Private Part चं 'ऑपरेशन' (AI Image)
युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने स्वत:चं गुप्तांग कापून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुप्तांग कापल्यानंतर तरुण स्वतःच्या खोलीमध्ये विव्हळत होता, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना याबद्दल माहिती मिळाली, यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. उपचार सुरू केल्यानंतर तरुणाला गुप्तांग कापण्याचं कारण विचारण्यात आलं, तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने तिथे असलेल्या सगळ्यांना धक्का बसला.
या तरुणाला स्वतःचं लिंग बदलू इच्छित होता, यासाठी त्याने पहिले स्वतःला भूल देण्याचे इंजेक्शन दिले, त्यानंतर त्याने सर्जिकल ब्लेडने गुप्तांग कापले. खोलीमध्ये वेदनेने विव्हळत असलेल्या तरुणाला पाहून घरमालकाने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तरुणाची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला अत्याधुनिक सुविधा असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं.
या तरुणाचे वय 22-23 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. मी मुलगा नाही तर मुलगी आहे, हे मी सांगत होतो, पण कुणीही माझं ऐकत नव्हतं. मला वयाच्या 14 वर्षांचा असल्यापासून मुलगी असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे लिंग बदलून मुलगी होण्यासाठी आपण स्वतःला भूल देण्याचे इंजेक्शन दिले आणि त्यानंतर सर्जिकल ब्लेडने गुप्तांग कापलं, यानंतर आपल्याला वेदना जाणवू लागल्या, त्यामुळे मी ओरडायला लागलो, असं त्याने सांगितलं आहे.
advertisement
हा तरुण अमेठी जिल्ह्यातील रहिवासी आहे. पालकांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तो कुटुंबातील सदस्यांना याबद्दल काहीही सांगू शकत नव्हता. काही दिवस हा मुलगा मावशीकडे राहिला, त्यानंतर तो प्रयागराजला शिक्षणासाठी आला. तिथे तो भाड्याच्या खोलीमध्ये राहून युपीएससी परीक्षेची तयारी करत होता.

युट्युबची मदत घेतली

अभ्यासादरम्यान तो लिंग बदलण्यासाठी यूट्यूबवर माहिती घेत होता. त्या तरुणाने कटरा येथील एका बनावट डॉक्टर झेनिथशी संपर्क साधला. त्याच्या सल्ल्यानुसार, त्याने मेडिकल स्टोअरमधून भूल देण्याचे इंजेक्शन आणि सर्जिकल ब्लेड विकत घेतले. मग त्याने स्वतः इंजेक्शन घेतले आणि जेव्हा त्याच्या कंबरेखालील भाग सुन्न झाला तेव्हा त्याने स्वतःच्या हातांनी त्याचं गुप्तांग कापलं.
advertisement
जोपर्यंत भूल देण्याच्या इंजेक्शनचा परिणाम टिकला तोपर्यंत तो सामान्य स्थितीत होता. पण भुलीचा परिणाम कमी होताच तो वेदनेने विव्हळू लागला. पण, लाजेमुळे तो कोणालाही काही सांगू इच्छित नव्हता. तरुण सुमारे एक तास खोलीत वेदनेमध्ये तसाच राहिला. वेदना कमी करण्यासाठी त्याने औषधही घेतलं, पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. दुसरीकडे खोलीमध्ये रक्त वाहत होते. हा सगळा प्रकार पाहून घरमालकाने रुग्णवाहिका बोलावली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
सध्या, तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथक तरुणाव उपचार करत आहे. मला मुलींमध्ये रस नाही, माझा आवाज आणि चालणंही मुलींसारखं आहे. मला लिंग बदलायचं होतं, म्हणून मी गुप्तांग कापण्याचं धोकादायक पाऊल उचललं, असं तरुण म्हणाला. दुसरीकडे मुलाची अवस्था पाहून त्याच्या आईला अश्रू अनावर झाले आहेत. मुलाची आईही त्याची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली आहे. माझ्या एकुलत्या एक मुलाला आधीसारखं करा, असं मुलीची आई डॉक्टरांना हात जोडून सांगत आहे.
advertisement

काय म्हणाले डॉक्टर?

एसआरएन रुग्णालयाचे मीडिया इन्चार्ज आणि वरिष्ठ सर्जन संतोष सिंग के म्हणाले की, 'विद्यार्थ्याला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा जेंडर डिसफोरिया आहे. त्याने स्वतःच्या हातांनी त्याचं गुप्तांग कापलं होतं. जेव्हा त्याला रुग्णालयात आणले गेले तेव्हा गुप्तांगातून खूप रक्तस्त्राव झाला होता. या आजारात रुग्णाला तो मुलगी आहे असं वाटतं, म्हणून तो बदलासाठी आपला जीव धोक्यात घालतो'.
advertisement
'जर विद्यार्थ्याला वेळेवर रुग्णालयात पोहोचता आले नसते तर तो आपला जीव गमावू शकला असता. विद्यार्थ्याचे समुपदेशन केले जाईल आणि त्याचे मत देखील घेतले जाईल. असे असूनही जर त्याला त्याचे लिंग बदलायचे असेल तर एक वर्ष उपचार आणि हार्मोन औषधे घेतल्यानंतर त्याचे लिंग बदलण्याची प्रक्रिया करता येते', अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
मराठी बातम्या/देश/
'मला मुलगी बनायचंय...', UPSC च्या विद्यार्थ्याचं घरात थरकाप उडवणारं कृत्य, स्वतःच्या हाताने केलं Private Part चं 'ऑपरेशन'
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement