Uttarkashi Cloudburst: 58 सेकंदात सगळं संपलं, 72 तासांनंतर उत्तरकाशीत काय स्थिती? ग्राऊंड रिपोर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जवळपास 50 हॉटेल्स, घरं ढिगाऱ्याखाली गेले. उत्तरकाशी आणि गंगोत्री इथे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पर्यटक देखील होते.
मुंबई: 58 सेकंदात अख्खं गाव ढिगाऱ्याखाली दबलं गेलं, 72 तासांनंतरही भयानक परिस्थिती आहे. उत्तरकाशीतील धराली इथे ढगफुटी झाल्यानंतर खीरगंगा नदीनं रौद्ररुप धारण केलं, त्यानंतर झालेल्या दुर्घटनेत अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गाढलं गेलं. जवळपास 50 हॉटेल्स, घरं ढिगाऱ्याखाली गेले. उत्तरकाशी आणि गंगोत्री इथे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पर्यटक देखील होते.
महाराष्ट्रातील मंचर, सोलापूर, आंबेगाव, पुण्याहून गेलेले पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना रेस्क्यू करण्यात आलं. या दुर्घटनेला 72 तास उलटल्यानंतर तिथे काय परिस्थिती आहे हे फोटो व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईल. 72 तासांपासून जवान रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. आतापर्यंत 400 लोकांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे.
जवानांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत घटनास्थळावरुन 70 नागरिकांना वाचवण्यात आले. 3 नागरिकांचा मृत्यू झाला. ५० हून अधिक बेपत्ता (नागरी प्रशासनानुसार). सैन्य: 1 जेसीओ आणि 8 जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. 9 लष्करी कर्मचारी आणि 3 नागरिकांना हेलिकॉप्टरने डेहराडूनला हलवण्यात आले.
advertisement
3 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऋषीकेश इथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 8 नागरिकांना उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
धाराली येथील आपत्तीनंतर राबविण्यात येणाऱ्या बचाव कार्यासाठी देहरादून पोलिस मुख्यालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बचाव कार्याची माहिती मिळू शकते. उत्तरकाशी, हर्षिल, पोलिस मुख्यालय यांच्याकडे समन्वय सोपवण्यात आला आहे. समन्वयासाठी 01352712685 , 2712231, 9411112985 हे नंबर जारी करण्यात आले आहेत.
advertisement
उत्तरकाशीतील धराली गावात ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध अजूनही सुरू आहे. केरळमधील 28 पर्यटकांच्या गटासह अनेक लोक अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कर, आयटीबीपी आणि एसडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 190 लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 11:54 AM IST
मराठी बातम्या/देश/
Uttarkashi Cloudburst: 58 सेकंदात सगळं संपलं, 72 तासांनंतर उत्तरकाशीत काय स्थिती? ग्राऊंड रिपोर्ट


